मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Wardha : रासायनिक खत महागल्यानं सेंद्रिय शेती ठरेल फायद्याची; कशी करतात सेंद्रिय शेती?, पहा VIDEO

Wardha : रासायनिक खत महागल्यानं सेंद्रिय शेती ठरेल फायद्याची; कशी करतात सेंद्रिय शेती?, पहा VIDEO

शेती हे लोकांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन असल्यामुळे शेती हा भारताचा आत्मा आहे. शेती टिकविण्यासाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर केल्यास रासायनिक खतांवर व औषधांवर होणारा खर्च वाचू शकतो. सेंद्रिय शेतीत खते व औषध नैसर्गिक साधनांचा वापर करून तयार करण्यात येत असतात. त्यामुळे याचा खर्च अल्पशा प्रमाणात होतो.

पुढे वाचा ...
    वर्धा, 25 जून : बदलत्या काळाबरोबर शेतीमध्येही अनेक आमूलाग्र बदल होत आहेत. यातच शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी वेगगवेळ्या प्रकारच्या रासायनिक खतांचा (fertilizers) वापर शेतीमध्ये वाढला आहे. कच्च्या मालाचा तुटवडा असल्यामुळे रारायनिक खतांच्या किमतीही वाढल्या आहेत. रासायनिक खतांच्या (Chemical fertilizer) अतिवापरामुळे शेतीचा पोत ढासळत आहे. त्यासह रासायनिक शेतीतील धान्य, भाजीपाल्याच्या सेवनामुळे मानवाला वेगवेळ्या प्रकारच्या आजारांना बळी पडावे लागेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेंद्रिय शेती (Organic farming) करावी, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात येत आहे. सेंद्रिय शेती म्हणजे काय, या शेतीचे फायदे, वैशिष्ट्ये या विशेष रिपोर्टमधून पाहूया. शेती हे लोकांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन असल्यामुळे शेती हा भारताचा आत्मा आहे. शेती टिकविण्यासाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर केल्यास रासायनिक खतांवर व औषधांवर होणारा खर्च वाचू शकतो. सेंद्रिय शेतीत खते व औषध नैसर्गिक साधनांचा वापर करून तयार करण्यात येत असतात. त्यामुळे याचा खर्च अल्पशा प्रमाणात होतो. सेंद्रीय शेती पद्धतीनुसार पारंपरिक बी-बियाणे वापरणे, जमिनीची धूप थांबविणे त्यासाठी योग्य ठिकाणी बांध घालणे, मशागत करणे, शेण-गोमूत्राचा जास्त वापर करणे. बैलांच्या मशागतीने जमिनीची नांगरणी उत्तम होते. नांगरणी उत्तम झाल्यामुळे पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होते. यासह शेणखत किंवा गांडूळखत वापर केला तर शेतकऱ्यांचा अधिक फायदा होतो.   वाचा : Career After 10th: दहावीनंतर पॉलिटेक्निक आहे बेस्ट पर्याय; या स्ट्रीममध्ये आहेत करिअरची मोठी संधी सध्या जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी जोरात सुरू आहे. अद्याप मुबलक पाऊस झाला नसला तरी हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे येत्या काही दिवसात चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पेरणीत बियाणांसह शेतकरी खतांचीही पेरणी करतो. यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खतांची खरेदी करावी लागेत. मात्र, यंदा खतांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कच्च्या मालाचा तुटवडा असल्यामुळे खतं महागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी महागडी रासायनिक खते खरेदी करण्यापेक्षा शेतातच सेंद्रिय पद्धतीने खतं निर्मिती करावी. यासाठी खर्चही कमी प्रमाणात येत असल्याची माहिती कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी दिली.  सेंद्रिय खतांचे प्रकार आणि वैशिष्ट्ये वनस्पतीचे अवशेष आणि प्राण्यांच्या मलमुत्रापासून जे खत तयार होतात त्याला सेंद्रिय खत म्हणतात. सेंद्रिय खतांमध्ये महत्त्वाची खते म्हणजे शेणखत, कंपोस्ट, हिरवळीची खते, गांडूळ खते, माश्यांचे खत, खाटिकखान्याचे खत, हाडांचे खत, तेलबियांची पेंड इत्यादी. शेंद्रिय खत दीड ते दोन महिन्यांत तयार होतात. गांडूळ खतात गांडुळांसह अडीच ते तीन टक्के नायट्रोजन, 1.5 ते 2 टक्के सल्फर आणि 1.5 ते 2 टक्के पोटॅश असते. हे घरी किंवा शेतात तयार केले जाऊ शकते. जर घराभोवती झाडे असतील तर कंपोस्ट बनविणे आणखी सोपे आहे कारण झाडाच्या सावलीत गांडूळ कंपोस्ट बनवता येतो. वाचा : 10वी, 12वीनंतर कोणता कोर्स निवडावा? अजूनही कन्फ्युज आहात? चिंता नको; ‘या’ टिप्समुळे घ्याल परफेक्ट निर्णय खत बनवण्याची पद्धत कमी खर्चात व्हर्मी कंपोस्ट बनवण्याचा सर्वात यशस्वी मार्ग म्हणजे शेण खत. हा खत झाडांच्या खाली बनवण्याचा फायदा हा आहे की, झाडाच्या पानांचाही खताला सेंद्रिय पदार्थ म्हणून उपयोग होतो. शेणात सेंद्रिय पदार्थ मिसळून वर्मी कंपोस्ट तयार केले जाते. यासाठी जास्त काही करण्याची आवश्यकता नाही. झाडाच्या सावलीत शेण ठेवून वर्मी कंपोस्ट सहज तयार केला जातो. तर गांडूळ खतासाठी एक मीटर लांब ब्लॉकलासाठी 1 हजार गांडुळे आवश्यक असते, हे लक्षात ठेवले पाहिजे. जर गांडुळांची गुणवत्ता चांगली असेल तर खतही चांगले होईल आणि त्याचप्रमाणे विक्री पण होईल.  कृषी विभागातून घ्या सेंद्रिय शेतीबाबत माहिती  शेतकऱ्यांनी शेंद्रिय शेतीची माहिती घेवून रासायनिक खतांऐवजी शेंद्रिय खतांचा वापर करावा, शेंद्रिय शेतीसाठी अधिक माहीत मिवण्यासाठी कृषी विभाग वर्धा, कार्यालय दुरध्वनी क्रमांक : ०७१५२ - २३२४४९,Email ID : dagriwar@rediffmail.com, संकेतस्थळ : krishimaharashtra.gov.in इथून अधिक माहिती घ्यावी. District Superintendent Agriculture Office गुगल मॅपवरून साभार सेंद्रिय शेतीचे फायदे शेतीवर अवलंबून असणाऱ्या जीवांना नैसर्गिक जीवन जगण्याचा हक्क सेंद्रिय शेती देते, पर्यावरण संरक्षणात महत्त्वाची भूमिका, अन्न सुरक्षेची खात्री व जीवनमान उंचावण्यास मदत, आर्थिक उत्पनात वाढ व खर्चात घट याद्वारे उत्तम आर्थिक नियोजन, सेंद्रिय शेतीमध्ये पारंपरिक पद्धतीचा उपयोग केला जातो, सेंद्रिय शेतीमध्ये पाळीव प्राण्यांचाही उपयोग केला जातो. त्यासोबतच या शेतीमध्ये नैसर्गिक वस्तूचा वापर केला जातो ज्या साधारणपणे शेतात मिळतात, सेंद्रिय शेतीतील शेतमालाची विक्री अधिक पैसे देऊन केली जाते कारणं ते शरीराला पोषक व फायदेशीर आहेत.  
    First published:

    Tags: Farmer, Organic farming, Wardha news

    पुढील बातम्या