मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठी संधी; JEE, NEET च्या मोफत प्रशिक्षणासाठी 'या' पद्धतीनं करा अर्ज

दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठी संधी; JEE, NEET च्या मोफत प्रशिक्षणासाठी 'या' पद्धतीनं करा अर्ज

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Wardha, India

    वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी

    वर्धा, 24 मार्च : जेईई, नीट परीक्षा देऊन भविष्याची स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'महाज्योती'नं मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. जे विद्यार्थी आता दहावीची परीक्षा देत आहेत किंवा ज्यांनी यावर्षी दहावीची परीक्षा दिली असून येत्या शैक्षणिक सत्रात 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेणार आहेत, अशा विद्यार्थ्यांना ही संधी असणार आहे. 2025 मध्ये होणाऱ्या जेईई, नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी त्यांना महाज्योती 18 महिन्यांचे मोफत प्रशिक्षण देणार आहे.

    महाज्योती योजना : नीट, सीईटीचे मोफत प्रशिक्षण

    ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थी दहावीमध्ये 60 ते 70 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होतात. त्यानंरत 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतात आणि जेईई नीट स्पर्धा परीक्षेला सामोरे जातात. बरेच विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्याने ते लाखो रुपये खर्चून शिकवणी वर्ग लावू शकत नाही. अशा विद्यार्थ्यांना महाज्योतीने 18 महिने मोफत प्रशिक्षण दिले जाते.

    कोणते विद्यार्थी पात्र ?

    महाज्योतीच्या या योजनेचा लाभ घेण्याकरिता सर्व ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी प्रवर्गातील दहावीची परीक्षा देणारे विद्यार्थी पात्र आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थी नियमित 11 वी व 12 वी शिकत असतानाच ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचा फायदा वर्ग 12 वीच्या परीक्षेतसुद्धा मिळणार आहे.

    मुलींच्या शिक्षणासाठी 'सायकल बँक' ठरली वरदान, पाहा कसा झाला बदल!

    कागदपत्रे काय लागतात?

    यासाठी विद्यार्थ्यांची नववी पासची गुणपत्रिका, दहावीचे हॉल तिकीट, रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र, आधार कार्ड याच्या प्रती या संकेतस्थळावर नोंदणी करताना अपलोड करावयाच्या आहेत. नोंदणी केलेल्या अर्जाची प्रिंट किंवा स्क्रीनशॉट जपून ठेवावा. दहावीचा निकाल लागल्यावर 11वी विज्ञानला प्रवेश घेतल्याचे महाविद्यालयाचे बोनाफाईड व नीट सीईटी परीक्षेची तयारी करीत असल्याचे हमीपत्र याच संकेतस्थळावर अपलोड करावे लागेल.

    घरबसल्या करा ऑनलाइन अर्ज

    या मोफत प्रशिक्षणाकरिता ऑनलाइन अर्ज करण्याचीही सुविधा असल्याने विद्यार्थ्यांना कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही. त्यांनी घर बसल्याच महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन 31 मार्चच्यापूर्वी नोंदणी करावी.

    6 वर्षांची चिमुरडी गाते तब्बल 15 भाषांमध्ये गाणी! पाहा भन्नाट Video

    प्रशिक्षणासाठी टॅबही मोफत

    या प्रशिक्षणासाठी यशस्वी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या वतीने एक आठ इंची ब्रँडेड कंपनीचा टॅब मोफत दिला जातो. तसेच प्रशिक्षणादरम्यान सुमारे दोन वर्षे दररोजचा सहा जीबी इंटरनेट डाटाही मोफत दिला जाणार आहे. ही सर्व माहित प्रा. दिवाकर गमे, माजी संचालक महाज्योती यांनी दिली आहे.

    First published:
    top videos

      Tags: Education, Local18, Wardha, Wardha news