मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Wardha: वनविभाग करणार 4 लाख वृक्षारोपण; वन्यप्राण्यांना लाभदायक वृक्षांचाही समावेश 

Wardha: वनविभाग करणार 4 लाख वृक्षारोपण; वन्यप्राण्यांना लाभदायक वृक्षांचाही समावेश 

X
फाईल

फाईल फोटो

वनविभागाच्या वतीने जिल्ह्यात 2022 या वर्षात 3 लाख 98 हजार 751 वृक्षलागवडीचंं लक्ष्यं ठेवण्यात आलं आहे. यासाठी विविध 18 रोपवाटिकेत तब्बल 6 लाख 76 हजार रोपांची निर्मिती करण्यात आली आहे.

    वर्धा, 14 जून : तापमान (Temperature) रोखण्यासाठी वृक्षलागवडकरुन वातावरणातील समतोल (Equilibrium in the atmosphere by planting trees) राखणे गरजेचे आहे. यासाठीच वनविभागाच्या वतीने जिल्ह्यात 2022 या वर्षात 3 लाख 98 हजार 751 वृक्षलागवडीचंं लक्ष्यं ठेवण्यात आलं आहे. यासाठी विविध 18 रोपवाटिकेत तब्बल 6 लाख 76 हजार रोपांची निर्मिती करण्यात आली असून, पाच वनपरिक्षेत्राअंतर्गत (Wardha Forest Department) एकूण 359 हेक्टवर विविध प्रजातींची रोपे लावण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.

    वाचा : BEED : जिलेबी आणि भजी मिक्स असणारा ‘टक्कर’ पॅटर्न माहितीय का? पहा या भन्नाट पदार्थाचा VIDEO

    अनेकदा वृक्षारोपण केल्यानंतर काही दिवसांतच ही वृक्ष नष्ट झालीची उदाहरणे पहायला मिळतात. वाढ न झाल्याने वृक्ष लागवड करुनही फायदा होत नाही. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून सध्या पर्जन्यमानावरही परिणाम झाला आहे. पाऊस टप्प्याटप्याने होत आहे. याचा विपरीत परिणाम पर्यावरण आणि शेतीवर होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने कर्तव्य म्हणून वृक्षारोपण करणे आवश्यक आहे.

    2020-21 या वर्षात 112 हेक्टवर 1 लाख 21 हजार 499 वृक्षांचे रोपण करण्यात आहे होते.  त्यापैकी 1 लाख 9 हजार 258 वृक्ष जगवण्यात वन विभाग यशस्वी झाले आहे. 2020-21 या वर्षात लागवडीच्या 89.93टक्के झाडे जगली आहेत. तर 2021-2022 या वर्षात 89 हेक्टवर 92 हजार 4 रोपांची लागवड करण्यात आली. त्यापैकी 90 हजार 720 झाडे जोमानं वाढल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

    वन्यप्राण्यांना लाभदायक अशा-वृक्षांची लागवड

    यावर्षी वनविभाग विविध प्रकारची झाले लावणार आहे. यात चिंच, आवळा. बोर, कडुलिंबू, वड, पिंपळ, शिसम, कवठ यासह वन्यप्राण्यांना लाभदायक अशा वृक्षांची लागवड करण्यात येत आहे.

     ...या वनपरिक्षेत्रात होणार लागवड

    वृक्षलागवड वनपरिक्षेत्रनिहाय उद्दिष्टाची माहिती देताना सहाय्यक नवसंरक्षक (तेंदु व वन्यजीव) अमरजित पवार यांनी सांगितले की,  "यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील पाच वनपरिक्षेत्र अंतर्गत 359 हेक्टरवर 3 लाख 98 हजार 752 रोपे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात आर्वी वनपरिक्षेत्रात 51 हेक्टरवर 56 हजार 651 रोपे, हिंगणी वनपरिक्षेत्रात 34 हेक्टरवर 37 हजार 774 रोपे, कारंजा येथे 15 हेक्टरवर 16 हजार 665 रोपे, समुद्रपूर येथे 27.61 हेक्टरवर 30 हजार 591 रोपे, तर वर्धा वनपरिक्षेत्रात 231.42 हेक्टरवर 2 लाख 57 हजार 60 रोपे लावण्याचे उद्दिष्ट आहे."

    First published:
    top videos

      Tags: Tree plantation, Wardha news