मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Wardha Special Report : शेतीची मशागत पूर्ण झाली; पण पाऊस कधी पडणार? शेतकरी वाट पाहतोय पावसाची!

Wardha Special Report : शेतीची मशागत पूर्ण झाली; पण पाऊस कधी पडणार? शेतकरी वाट पाहतोय पावसाची!

यंदा पाऊस वेळेपूर्वीच राज्यात दाखल होईल, असे हवामान खात्याने सांगितले होते. मात्र, अजुनही पावसाने हजेरी लावलेली नाही. शेतीची मशागत आणि इतर कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे वर्ध्यातील शेतकरी (Farmers of Wardha) पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.

पुढे वाचा ...

वर्धा, 10 जून : यावर्षी पाऊस वेळेत दाखल होण्याचे संकेत हवामान खात्याने (Meteorological Department) दिले होते. मात्र, पावसाने अजुनही हजेरी लावलेली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात खरीपपूर्व शेतीकामांना वेग आला आहे. रखरखत्या उन्हातही शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामांना सुरुवात केली आहे. यात बैलजोडी आणि ट्रॅक्टरने मशागत केली आहे. पंरतु, पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी पेरणीसाठी पावसाची वाट पाहत आहे. (Farmers in Wardha waiting for rain)

मागील वर्षी मोसमी पावसाने शेतातील पिकांचे अतोनात नुकसान केल्याने शेतकरी अडचणीत आला होता. यंदाच्या खरीपात तरी निसर्ग साथ देईल आणि शेतीतून काहीतरी उत्पन्न हाती येईल, अशी अपेक्षा आहे. शेतकरी मशागतीत व्यस्त आहेत. काही जणांना बैलजोडीचे आणि ट्रॅक्टर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने त्यांनाही शेतकामांसाठी बैलजाडी आणि ट्रॅक्टरचा शोध घ्यावा लागत आहे.

वाचा : Monsoon Update : मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा संपली, गोवा आणि दक्षिण कोकणात मान्सून दाखल imd कडून माहिती

यासंदर्भात शेतकरी पुरुषोत्तम बदराखे म्हणतात की, "काही ट्रॅक्टर असल्याने ते मशागत करतात. मात्र, ज्यांच्याकडे बैलजोडी आहे ते मशागत करतात. मात्र, त्यात खूप वेळ खर्च होतो. शिवाय शेतीची नांगरणी समाधानकारक होत नाही. यापेक्षा ट्रॅक्टर सहज खोलवर होते. यामुळे शेतकऱ्यांचा ट्रॅक्टरद्वारे मशागतीकडे कल वाढला आहे. परंपरागत बैलजोडीच्या सहाय्याने मशागत न करता आधुनिक पद्धतीने म्हणजे ट्रॅक्टरद्वारे मशागत करण्यावर जोर दिसून येते आहे."

वाचा : Maharashtra Water Crisis : राज्यातील धरणांमध्ये 26.28 टक्के पाणीसाठा शिल्लक, पाऊस नाही झाल्यास भीषण परिस्थिती

शेतकरी प्रशांत सरदार सांगतात की, "अगोदरच मागील दोन वर्षांपासून खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळीराजा कर्जाच्या खाईत लोटला गेला. मात्र, तरी देखील यंदा शेतकरी जोमाने व आशेने मशागतीच्या कामाला लागला आहे. अनेक शेतकन्यांनी भाव वाढेल, या आशेने शेतमाल घरातच ठेवलेला आहेत. कापसाला शेवटच्या टप्पात चांगला भाव मिळत आहे. मात्र, सोयाबीन, तूर, चणा या पिकाला कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे."

वाचा : Monsoon Update : देशात यंदा 100 टक्क्यांपेक्षाही जास्त पाऊस, हवामान खात्याचा अंदाज काय सांगतो?

शेतकरी (Farmers of Wardha) जमिनीचे पोत सुधारण्यासाठी शेतकरी रासायनिक खतापेक्षा शेण खत शेतात टाकत आहेत. मागील वर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने विहिरी आणि तलावांनी तळ गाठलेला नाही. ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे ते शेतकरी यावर्षी कापूस लागवड करणार आहे. यावर्षी कापसाला चांगल्या प्रकारे भाव मिळाले. बोंडअळी आली, तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. कापसाच्या दरामुळे जिल्ह्यात यावर्षी कपाशीचा पेरा वाढणार असल्याची शक्यता आहे.

First published: