मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Wardha News: 3 महिन्यात लखपती बनवणाऱ्या चिया वनस्पतीची शेती कशी करतात? पाहा Video

Wardha News: 3 महिन्यात लखपती बनवणाऱ्या चिया वनस्पतीची शेती कशी करतात? पाहा Video

X
वर्धा

वर्धा जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी चिया या औषधी वनस्पतीची शेती सुरू केली आहे. या शेतीतून शेतकरी तीन महिन्यांत लखपती झाले आहेत.

वर्धा जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी चिया या औषधी वनस्पतीची शेती सुरू केली आहे. या शेतीतून शेतकरी तीन महिन्यांत लखपती झाले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Wardha, India

    वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी

    वर्धा, 14 मार्च : शेती बिनभरवशाचा व्यवसाय मानला जात असला तरी काही शेतकरी नवनवीन प्रयोग करून लाखोंचे उत्पन्न मिळवतात. वर्धा जिल्ह्यातील शेतकरीही आधुनिक शेतीचे वेगळे प्रयोग करत आहेत. सेलू तालुक्यातील 15 ते 20 शेतकऱ्यांनी चिया या औषधी वनस्पतीची शेती सुरू केली आहे. एका खासगी कंपनीशी करार करून चिया शेतीचा प्रयोग केला असून शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होत आहे. धानोरा येथील उल्हास जैन यांनी दीड एकरात चिया वनस्पतीची लागवड करून तीन महिन्यांत 90 हजारांचे उत्पन्न मिळवले आहे.

    काय आहे चिया वनस्पती?

    शेतकरी आता पारंपरिक पिकांबरोबरच नवीन पिकांच्या लागवडीकडे वळत आहेत. औषधी चिया वनस्पतीची शेती हा असाच एक प्रयोग आहे. चिया बियाणे हे कोणतेही सामान्य बियाणे नसून त्यांचे औषधी मूल्य देखील आहे. ओमेगा-3 फैटी एसिडच्या गुणधर्मांनी समृद्ध चिया बिया रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. त्यात असलेले कॅल्शियम, फायबर, प्रथिने आणि सर्व खनिजे यांसारखी पोषक तत्त्वे हृदय आणि मनासह शरीराला चांगले आरोग्य देतात. मोठ्या शहरांमध्ये लोक चिया बिया पाण्यात किंवा दुधात मिसळून खातात. त्यामुळे शेतीत हे बियाणे लावल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा मिळू शकतो.

    लागवडीसाठी जमीन कशी असावी ?

    चियाला नवीन काळातील सुपरफूड असेही म्हणतात. आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्याने बाजारात त्याचा भाव चांगला राहतो. चिया बिया कोणत्याही प्रकारची माती आणि हवामानात येतात. चांगल्या निचऱ्याची हलकी आणि वालुकामय जमीन योग्य आहे.

    चिया बियाणांची लागवड कधी?

    चिया बियाणांच्या लागवडीसाठी महिन्याच्या दृष्टीने सप्टेंबर ते नोव्हेंबर हा काळ योग्य आहे. चियाची लागण पेरणीच्या माध्यमातून केली जाते. एक एकरात बियाणे पिकवायचे असेल तर सुमारे २ किलो बियाणे लागते.

    Beed News: अबब! बीडच्या शेतकऱ्याने पिकवला तब्बल पाच किलोचा मुळा! नेमका काय आहे प्रकार?

    एक एकरात किती खर्च येईल?

    एक एकर शेतात चिया पीक घेण्यासाठी सुमारे रु. 11 हजार रुपयांचा खर्च येतो. जे तीन महिन्यात ४ क्विंटलहून अधिक उत्पादन देते. त्यामुळे कमी कालावधीत चांगले उत्पन्न देणारा पर्याय म्हणून चिया शेतीकडे पाहिले जाते. बाजारात चिया बियांची किंमत 100 ते 200 रुपये प्रति किलो आहे. जर तुम्ही एक एकरातून 4 ते 7 क्विंटल चियाच्या बियांचे उत्पादन तीन महिन्यात घेतले तर तुम्ही सहज 40 हजारापर्यंत नफा मिळवू शकता. त्यामुळे चियाच्या शेतीकडे लोक वळत आहेत.

    First published:
    top videos

      Tags: Agriculture, Local18, Wardha, Wardha news