मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Wardha : गांधीजींनी नामकरण केलेल्या 'गोपुरी'त चरख्याद्वारे कापड निर्मिती, पहा VIDEO

Wardha : गांधीजींनी नामकरण केलेल्या 'गोपुरी'त चरख्याद्वारे कापड निर्मिती, पहा VIDEO

विदर्भात कापसाचे उत्पादन (Cotton Production) अधिक आहे. यामुळे विदर्भाच्या गावागावत जर कापूस पासून कापड बनलं तर ग्रामीण भागातील गरजू लोकांना रोजगार, खेड्यापाड्यातील कारागीर व बलुतेदार यांच्या उद्योगाचे स्थैर्य मिळेल.

  वर्धा, 22 जून : एकाच व्यवसायाशी निगडीत उद्योग करणाऱ्या लहान-लहान उद्योग गटांना एकत्र आणून ‘कापूस ते कापड’ (Fiber to Fashion) या प्रक्रियेचं चक्र जिल्ह्यात गतिमान झालं आहे. यात १९३१ साली स्थापन झालेल्या जिल्ह्यातील गोपूरी येथील ग्राम सेवा मंडळाचा (Gram Sewa Mandal Gopuri) मोठा वाटा आहे. ग्रामसेवा मंडळ चरखे, तेलघाण्या व खादीवस्त्राची निर्मिती करणारी संस्था म्हणून ओळखली जाते. ग्राम सेवा मंडळात जवळपास 200 लोकांना रोजगार मिळाला असून यात विविध प्रकारचे विणकर, रंगाची -शिलाई करणारे कामगार आहे. साडी, धोतर, जॉकेट, चादरी, कुर्ता-पायजामा यांसारख्या विविध प्रकारचे कपडे इथं तयार केले जातात. विदर्भातील कापसाचे उत्पादन  पाहता ‘कापूस ते कापड’ असे स्वप्न समोर ठेवले. या धोरणातूनच महाराष्ट्रात एकाधिकार योजना समोर आली. विदर्भात कापसाचे उत्पादन  (Cotton Production) अधिक आहे. यामुळे विदर्भाच्या गावागावत जर कापूस पासून कापड बनलं तर ग्रामीण भागातील गरजू लोकांना रोजगार, खेड्यापाड्यातील कारागीर व बलुतेदार यांच्या उद्योगाचे स्थैर्य मिळेल. स्वयंरोजगाराच्या क्षेत्राची व्यापक प्रमाणात वृध्दी, खादी व ग्रामोद्योगासाठी पतपुरवठा, कच्चा माल पुरवठ्याची शिफारस, कारागिरांचे तांत्रिक कौशल्य वाढविण्यास उत्तेजन, तयार मालाच्या विक्रीस मदत, निवडक ग्रामोद्योगांचे प्रशिक्षण, खादी ग्रामोद्योगाच्या विकासास पोषक असे धोरण ग्राम सेवा मंडळाचे आहे.  वाचा : मुलांनो, करिअर इथंही चांगलंय! मुंबई विद्यापीठाकडून ‘पाली’चे 7 कोर्सेस सुरू; कसा कराल अर्ज? VIDEO
  ग्राम सेवा मंडळाची पार्श्वभूमी व वैचारिक बैठक ६ मे १९३४ साली विनोबा भावे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्राम सेवा मंडळाची स्थापना वर्धा शहराजवळ केली. विनोबांना संघर्षात्मक लढ्यांना रचनात्मक कार्याशी जोडण्याचा खूप चांगली दृष्टी होती, जेणेकरून ज्यासाठी संघर्ष करायचा ती तत्वे आपल्या जीवनशैलीचा भाग बनतील. स्वातंत्र्य लढ्याच्या काळात 'स्वराज्य' खऱ्या अर्थाने शेवटच्या माणसापर्यंत पोचावे यासाठी 'खेड्याकडे चला' या गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक तरुण खेड्यात काम करू लागले होते. हाती चरखा हे मोठे प्रभावी अवजार घेऊन ग्रामस्वावलंबन हा उद्देश ठेवून त्यादृष्टीने गावाला लागतील अशी छोट्या स्वरूपाची यंत्रसामग्री तयार करणे आणि स्वत: अन्न, वस्त्रनिर्मितीच्या बाबतीत स्वावलंबी असेल असे आदर्श गाव उभे करणे या उद्देशाने अनेक व्रतनिष्ठ कार्यकर्त्यांना व त्यांच्या परिवारांना जोडून घेऊन विनोबांनी 'ग्राम सेवा मंडळ' ची उभारणी केली. गांधीजींनी 'गोपुरी' असे नामकरण केले. सुरुवातीला नालवाडी गावात हे कार्य सुरु झाले. काही वर्षातच या कार्याचा विस्तार वाढला, अधिकाधिक परिवार जोडले जाऊ लागले तसे जमनालाल बजाज यांच्या मदतीने व गांधीजींनी उभारलेल्या आर्थिक सहयोगाने वर्धा- नागपूर रोड जवळ बरीच शेत जमीन खरेदी केली आणि तेथे राधाकृष्ण बजाज यांच्या देखरेखीखाली कार्यकर्ते परीवारांसाठी सुंदर, टिकाऊ, निसर्गस्नेही, स्वस्त घरे उभारली गेली. ग्राम सेवेचा हेतू लक्षात घेऊन छोट्या उद्यागांचे कारखाने, गोशाळा, कार्यालये बांधली गेली. या छोटेखानी गावाचे पुढे गांधीजींनी 'गोपुरी' असे नामकरण केले. यामध्ये आता जवळपास 200 लोकांना रोजगार मिळाला आहे या विविध प्रकारचे विणकर रंगाची -शिलाई करणारे कामगार आहे.  तसचे येथे वेगवेगळ्या वस्त्र निर्माण केलं जातात. त्यामध्ये साडी, धोतर, जॉकेट, चादरी, कुर्ता-पायजामा यांचा समावेश आहे. Gram Seva Mandal
  गुगल मॅपवरुन साभार
  कोरोनाचा कापड व्यवसायावर परिणाम करोना संक्रमणाच्या दृष्टचक्रात ग्राम सेवा मंडळाचे मोठे नुकसान झाले. गांधी विचारांचा अंगीकार करीत ग्रामीण लघु उद्योगाला चालना देण्यासाठी स्थापन झालेली संस्था करोना काळात कोलमडण्याच्या स्थितीत होती. कोरोनामुळे उत्पादन ठप्प, कामगारांना वेतन नाही, आवकजावक बंद, अशी स्थिती होती. मात्र, आता कोरोनाचा परिणाम कमी झाल्याने स्थिती पुर्वपदावर येत आहे. वाचा : MH BOARD SSC RESULT: निकाल तर लागला! पण आता पुढे काय? ‘हे’ आहेत 10वी नंतरचे बेस्ट करिअर ऑप्शन्स उन्हाळ्यात थंड व हिवाळ्यात उबदार कपडे ग्रामउद्योगात तयार झालेल्या वस्तू कृषिप्रधान अर्थव्यवस्थेला चालना देतात. या माध्यमातून गावातला पैसा गावात राहतो यामुळे ग्रामस्वावलंबन होण्यास मदत होते. ग्रामसेवा मंडळ गोपुरी वर्धाचा खादी कपडा हा चांगल्या दर्जाचा असून उन्हाळ्यात थंड व हिवाळ्यात गरम व उबदार राहतो. खादीमध्ये गांधी खादी, बंगाली, पांढरी शुभ्र खादीच्या शर्ट, दुपट्ट्याला चांगली मागणी असते. याशिवाय कापडाचीही मागणी बऱ्यापैकी आहे. विविध रंगांमध्ये खादीचे कपडे याठिकाणी तयार केले जातात. 
  First published:

  Tags: Wardha news

  पुढील बातम्या