मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

वर्धा : शैक्षणिक साहित्य 30 टक्क्यांनी महागलं! पालकांच्या खिशाला लागतेय कात्री

वर्धा : शैक्षणिक साहित्य 30 टक्क्यांनी महागलं! पालकांच्या खिशाला लागतेय कात्री

 शालेय साहित्याच्या किमतीत पुन्हा वाढ झाली 20 ते 30 टक्के वाढ

 शालेय साहित्याच्या किमतीत पुन्हा वाढ झाली 20 ते 30 टक्के वाढ

वर्धा : विद्यार्थ्यांचं शालेय वर्ष नुकतंच सुरू होतंय. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यासहीत (Schools students) पालकांचीही शैक्षणिक साहित्यांची खरेदीची करण्याची घाई सुरू आहे. मात्र, मागील वर्षाचा तुलनेत यंदा शैक्षणिक साहित्यातांच्या किमतींमध्ये 20 ते 30 टक्क्यांनी (Educational material is expensive) वाढ झाली आहे.

पुढे वाचा ...

वर्धा, 2 जून : विद्यार्थ्यांचं शालेय वर्ष नुकतंच सुरू होतंय. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यासहीत (Schools students) पालकांचीही शैक्षणिक साहित्यांची खरेदीची करण्याची घाई सुरू आहे. मात्र, मागील वर्षाचा तुलनेत यंदा शैक्षणिक साहित्यातांच्या किमतींमध्ये 20 ते 30 टक्क्यांनी (Educational material is expensive) वाढ झाली आहे. त्यामुळे पालकांच्या (parents) खिशाला कात्री लागताना दिसत आहे.

2020-21 आणि 2021-22 मध्ये कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. यावेळी ऑनलाइन शिक्षणाची सुरुवात झाली. त्यामुळे फारसे शैक्षणिक साहित्य खरेदी करावे लागले नाही. कारण, घरातूून मुलांचे वर्ग होत होते. या कालावधीत शैक्षणिक साहित्यांच्या किमतीदेखील होत्या. मात्र, ऑफलाईन वर्ग सुरू झाल्यामुळे शैक्षणिक साहित्य खरेदी करत आहे, पण शैक्षणिक साहित्याच्या किमती 20-30 टक्क्यांची वाढ झाल्यामुळे पालकांना आणि विद्यार्थ्यांना जादाची रक्कम मोजावी लागत आहे.

वाचा : शाहरुख खान-नयनताराच्या सिनेमाचं नाव आलं समोर? बॉलिवूड किंगसोबत रोमान्स करणार साऊथ सुंदरी

जानेवारी 2022 पासून शाळा आणि महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहेत. नवीन शैक्षणिक सत्र सुरू होताच पालकांना आपल्या मुलांसाठी शालेय दप्तरांपासून ते नोटबुक, पेन, पाण्याच्या बाटल्यांपर्यंत नवीन वस्तू खरेदी कराव्या लागणार आहेत. मात्र यंदा शैक्षणिक साहित्याच्या किमती वाढल्यामुळे खरेदीमध्ये पालकांच्या खिशाला कात्री लागत आहे.

शैक्षणिक साहित्यावरही जीएसटी वाढला

गेल्या वर्षी शैक्षणिक साहित्यावरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 16 टक्के करण्यात आला होता. त्यामुळे कागदाचे दर आणि वाहतूक खर्च वाढला आहे. त्याचबरोबर वेतन, वाहतूक, इतर खर्च वाढल्याने शैक्षणिक साहित्याच्या किमती वाढल्या आहेत. गेल्या वर्षी प्रति 100 पानांच्या प्रतींचा दर प्रति डझन 200 ते 220 रुपये होता. यंदा 200 पानांच्या प्रतींची किंमत प्रति डझन 350 रुपयांवरून 400 रुपयांपर्यंत वाढली आहे. शालेय दप्तर, शूज, पाण्याच्या बाटल्या, गणवेश आणि सामानाच्या किमती किमान 20 ते 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत. पण पालकांचे उत्पन्न पूर्वी इतकेच आहे.

शालेय साहित्यांचे दर

सरकारी खासगी आणि इंग्रजी माध्यमांचे गणवेश वेगवेगळे असतात. त्यामुळे त्याच्या दरही दर्जानुसारच ठरत आहे. शहरातील कापड दुकानात मराठी शाळांचे गणवेश 300 ते 600 रुपयांपर्यंत, तर इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या गणवेशाचे जर किमान 500 ते अडीच हजार रुपयांपर्यंत आहेत. गतवर्षीपेक्षा गणवेशाच्या किमतीत दुपटीने वाढ झाली आहे. वॉटर बॅग 50 ते 300 रुपये, कंपास पेटी 30 ते 200 रुपये, टिफिन बॉक्स 50 ते 250 रुपये, रेनकोट लहान मुले 200 ते 550 रुपये असे दर सध्या दुकानांमध्ये आहेत.

First published: