मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Wardha : काळजी घ्या ! पावसाळ्यात कोरोना पुन्हा पसरतोय, वाढत्या रुग्णांमुळं प्रशासन सतर्क

Wardha : काळजी घ्या ! पावसाळ्यात कोरोना पुन्हा पसरतोय, वाढत्या रुग्णांमुळं प्रशासन सतर्क

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाने पाय पसरवले आहेत. जिल्ह्यात मे महिन्यापर्यंत जवळपास पूर्णपणे कोरोना हद्दपार झाला असताना पुन्हा जून महिन्यात कोरोनाने शिरकाव केला आहे. रुग्ण संख्या कमी ज्यास्त होत असल्याने प्रशासन सतर्क असून नागरिकांनी देखील कोरोनाबाबत काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पुढे वाचा ...
वर्धा, 17 जून : कोरोनाची (Corona) तिसरी लाट ओसरतांना रुग्ण संख्या कमालीची घटली होती. यामुळं नागरिक आणि आरोग्य प्रशासन आनंदात होतं. पण आता परत कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत जाताना दिसत आहे. वर्धा जिल्ह्यात देखील मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले (Corona cases increase in wardha) असून प्रशासनाची चिंता वाढली आहे, कोरोनाची चौथी लाट आल्याची चर्चा नागरीकांमध्ये सुरू असली तरी याबाबत आरोग्य विभागाकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही. जिल्ह्यातील वाढल्या कोरोना रुग्णाबाबतचा हा रिपोर्ट पाहूया. वाचा- बीडच्या मुलांनो इकडे लक्ष द्या! इथल्या ITI मध्ये 1-2 वर्षांचा कोर्स संपताच, लगेच लागतो जाॅब, वाचा SPECIAL REPORT गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाने पाय पसरवले आहेत. जिल्ह्यात मे महिन्यापर्यंत जवळपास पूर्णपणे कोरोना हद्दपार झाला असताना पुन्हा जून महिन्यात कोरोनाने शिरकाव केला आहे. 15 जून बुधवारी एकाच दिवसांत 13 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या. मात्र, गेल्या 24 तासात 154 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून यात 3 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने कोरोना रुग्ण संखा कमी झाल्याचे आढळले आहे. रुग्ण संख्या कमी ज्यास्त होत असल्याने प्रशासन सतर्क असून नागरिकांनी देखील कोरोनाबाबत काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 20989 व्यक्तींनी घेतला प्रिकॉशन डोस कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतही कोरोनाचा संसर्ग होत असल्याने आता प्रिकॉशन्सचा तिसरा डोस देण्यात येत आहे.जिल्ह्यात आजपर्यंत 20 हजार 989 व्यक्तींनी प्रिकॉशन डोस घेतला आहे. हे वाचा - बापरे! या विचित्र जीवाला पाहून सर्वांना फुटला घाम; हा कोण आहे तुम्हाला माहितीये का? जिल्ह्यात 18 लाख व्यक्तींचे लसीकरण जिल्ह्यात आजपर्यंत 17 लाख 99 हजार 758 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी 10 लाख 19 हजार 304 जणांनी पहिला डोस तर 7 लाख 80 हजार 454 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे वाढत्या कोरोनाची रुग्णसंख्या पाहता लसीकरणाचा वेग आणखी वाढवावा लागणार आहे. आजपर्यंत जिल्ह्यात 101.62 टक्के हेल्थ वर्करांनी पहिला डोस, 94.83 टक्के हेल्थवर्करांनी दुसरा डोस तर प्रिकॉशन डोस 29.10 टक्के वर्कसांनी घेतला आहे. फ्रंट लाइन वर्कर पहिला डोस 117.38 टक्के, दुसरा डोस 109.16 टक्के तर प्रिकॉशन डोस 20.26 टक्के, 12 ते 14 वर्षे पहिला डोस 70.18 टक्के. दुसरा 27. 48 टक्के, 15 ते 17 वयोगट पहिला डोस 62.38 टक्के, दुसरा 38.80 टक्के, 18 ते 44 वयोगट पहिला डोस 87.53 टक्के, दुसरा 64.98 टक्के 45 ते 59 वयोगट पहिला डोस 111.11 टक्के, दुसरा 92.57 टक्के, 60 वर्षावरील वयोगट पहिला डोस 120.77 टक्के. दुसरा 97.25 टक्के, प्रिकॉशन 8.41 टक्के याप्रमाणे 10 लाख 19 हजार 304 व्यक्तींनी पहिला डोस 95.23 टक्के तर 7 लाख 80 हजार 454 व्यक्तींनी दुसरा डोस 72.92 टक्के घेतला आहे. ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह  - 21 सध्या होम आयसोलेशनमध्ये असलेले एकूण 21 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठवलेले एकूण स्त्राव नमुने 5 लाख 35 हजार 19 असून, त्यापैकी 4,73,345 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधिताची संख्या 58 हजार 144 एवढी झाली आहे. तर एकूण 57,164 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 1351 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 21 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1351 जणांचा मृत्यू  चौथी लाट टाळण्यासाठी नागरिकांना कोरोनाची लस पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत असून, जिल्ह्यात आतापर्यंत 58 हजार 144 कोरोना बाधितांची नोंद झाली असून, त्यापैकी 57 हजार 164 जणांनी कोरोनावर मात केली असून, जिल्ह्यातील 1351 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी कोरोना नियमांचे गांभीर्याने पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.  …अशी घ्या काळजी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, हात वेळोवेळी धुवा, हात साबणाने किंना सॅनिटायझरने किमान 20 सेकंद धुवावेत, शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. अशी ठिकाणे टाळावीत, बोटांचा अग्र भाग आणि पूर्ण हात धुतला पाहिजे, बाहेरुन घरात येताना प्रथम हात स्वच्छ धुवून घ्यावेत. नंतर घरात वावर करावा, शक्यतो डोळे, नाक, तोंडला हाताने संपर्क करणे टाळावे. 
First published:

Tags: Corona, Corona updates, Wardha news

पुढील बातम्या