मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नाना पटोले हे देवेंद्र फडणवीसांच्या नखाची बरोबरी करू शकत नाही : चंद्रशेखर बावनकुळे

नाना पटोले हे देवेंद्र फडणवीसांच्या नखाची बरोबरी करू शकत नाही : चंद्रशेखर बावनकुळे

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधत महत्त्वाची माहिती दिली. यावेळी त्यांनी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही टीका केली.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Wardha, India
  • Published by:  Chetan Patil

वर्धा, 25 सप्टेंबर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली. देवेंद्र फडणवीस यांना सहा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याच मुद्द्यावरुन पटोले यांनी टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं. "नाना पटोले हे देवेंद्र फडणवीसांच्या नखाची बरोबरी करू शकत नाहीत. नाना पटोले यांच्या जिल्ह्यात, त्यांच्या मतदारसंघ त्यांनी बघितलं पाहिजे की काय परिस्थिती आहे. फडणवीस यांना बिनपाठ वर्धा, गोंदिया, अमरावती, अकोला माहीत आहे. नाना पटोले यांना अभ्यास करावा लागेल. यामुळे नाना पटोले यांची देवेंद्र फडणवीसबद्दल बोलण्याची उंची राहिली नाही. नाना पटोले हे त्यांच्या पक्षाचे जिल्ह्याचे नेते राहिले आहेत आणि काही दिवसात ते विधानसभेचे नेते होतील, अशी स्थिती त्यांची आहे", अशी खोचक टीका बावनकुळे यांनी केली. तसेच प्रत्येक बूथवर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या प्रत्येकी 25 कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश घ्यायचा, असा ध्यास घेतल्याचा ते म्हणाले.

"महाविकास आघाडी सरकार असतांना अडीच वर्ष झाले, धानाचा बोनस दिला नाही. शेतकऱ्यांची वीज कापली, शेतकऱ्यांना वीज दिली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या डेव्हलपमेंटच्या विजनची नाना पटोले एक टक्का बरोबरी करू शकत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांना संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याची पूर्ण माहिती आहे", असंही ते म्हणाले.

(वाळवंटात वादळ! काँग्रेसचं आणखी एक राज्य संकटात, गहलोत गटाचे 92 आमदार राजीनाम्याच्या तयारीत)

"सरकारमध्ये असतांना उद्धव ठाकरे यांना आपलं कुटुंब आपली जबाबदारी एवढंच दिसत होतं. यामुळे मी मुख्यमंत्री आणी मुलगा उपमुख्यमंत्री असंच होतं. आताही मुंबईमध्ये बॅनर पाहिलं तर चारच फोटो दिसत आहेत. यामुळे उद्धव ठाकरेंची जी परिस्थितीत निर्माण झाली आहे, आपलं कुटुंब आपली जबाबदारी हेच उद्धव ठाकरेंचं धोरण आहे. यामुळे त्यांच्याकडे कोणीही राहायला तयार नाही. एकदिवस राहील की उद्धव ठाकरेंच्या स्टेजवर चारच लोक दिसतील. एकनाथ शिंदे जे सांगतात ही गोष्ट खरी आहे की जेव्हा कार्यकर्त्यांना द्यायची वेळ आली तेव्हा स्वतः तयार झाले. उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विचार घेऊन महाराष्ट्राच्या सत्तेत बसले. मग महाराष्ट्राचं वाटोळंच होणार आहे", असा घणाघात त्यांनी केला.

"पुढील काळात महाविकास आघाडीतील पक्षांत बॉम्बस्फोट होणार आहे. तुम्हाला सकाळी वेगवेगळ्या बातम्या पहावयास मिळेल. वर्धेपासून तर कोल्हापूर पर्यंत, गडचिरोली पासून गडहिंगलपर्यंत पुढच्या काळात खूप बातम्या येतील. आम्ही ठरवलं आहे प्रत्येक बूथच्या शाखेवर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणी उद्धव ठाकरे गटाचे पंचवीस कार्यकर्ते यांचा भाजपात प्रवेश घ्यायचा. मागील सरकारचा जो मोठ्या प्रमाणात असंतोष आहे त्या असंतोषाला भाजपात प्रवेश करून नवीन स्थापन झालेलं एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारकच्या माध्यमातून जनतेच्या आशा-अपेक्षा पूर्ण करने", असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

First published:

Tags: BJP, Devendra Fadnavis