मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'..तर आम्ही महाराष्ट्राची माफी मागू, नाहीतर आंदोलन करू'; वेदांतावरून चंद्रशेखर बावनकुळे भडकले

'..तर आम्ही महाराष्ट्राची माफी मागू, नाहीतर आंदोलन करू'; वेदांतावरून चंद्रशेखर बावनकुळे भडकले

महाविकास आघाडी सरकारच्या उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले यांनी वेदांता प्रकरणी एक तरी कागद दाखवा, असं थेट आव्हान बावनकुळे यांनी दिलं आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले यांनी वेदांता प्रकरणी एक तरी कागद दाखवा, असं थेट आव्हान बावनकुळे यांनी दिलं आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले यांनी वेदांता प्रकरणी एक तरी कागद दाखवा, असं थेट आव्हान बावनकुळे यांनी दिलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Wardha, India
  • Published by:  Kiran Pharate

नरेंद्र मते वर्धा 26 सप्टेंबर : वेदांता-फॉक्सकॉन हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यानंतर राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं. विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या सरकारवर टीका केली. वेदांता फॉक्सकॉननंतर आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्याचा आरोप केला जात आहे. वेदांत-फॉक्सकॉन व बल्क ड्रग पार्क या दोन प्रकल्पांपाठोपाठ आता महाराष्ट्राला मेडिसीन डिवाइस पार्क योजनेलाही मुकावे लागले आहे. यावरुनही उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते भाजपवर आणि शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधत आहेत. त्यांना आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

शिंदे सरकार घेणार मोठा निर्णय, उद्धव ठाकरेंच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा 'घास' हिरावणार?

महाविकास आघाडी सरकारच्या उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले यांनी वेदांता प्रकरणी एक तरी कागद दाखवा, असं थेट आव्हान बावनकुळे यांनी दिलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी एमओयू आणि जमीन खरेदीचा कागद समोर आणावा, कागद दाखविल्यास आम्ही महाराष्ट्राची माफी मागू, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

कुठेही, कोणत्याही वेळी, कोणत्याही मंचावर आमने सामने या...मी तयार आहे, असं चॅलेंजही त्यांनी दिलं. महाविकास आघाडीने खोटं बोलणं सोडावं नाहीतर आम्हाला जशास तसं उत्तर द्यावे लागेल. आम्हाला आंदोलन करावं लागेल, असा थेट इशाराच चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

सत्तांतर होताच मराठा आरक्षणाची खाज का सुटली? तानाजी सावंत यांचं वक्तव्य

याआधी या प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली की 'मला त्यांना एक विचारायचे आहे, मेडिकल डिव्हाईस पार्क महाराष्ट्रात येणार होता, याचा एक चिठीवर पुरावा तरी तुम्ही दाखवणार का? मनात येईल ते बोलायचं अडीच वर्षे होते थोडे थोडके नव्हते. अडीच वर्षात काहीच केलं नाही, अडीच वर्ष केवळ केंद्र सरकारला शिव्या द्यायच्या एवढं एकमेव काम केलं आणि आता वाटेल ते मनात येईल ते बोलतात.'

First published:

Tags: Maharashtra politics, Uddhav Thackeray