मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Wardha : वाघांसह इतर दुर्मिळ प्राणी पहायचेत? मग ‘बोर व्याघ्र प्रकल्पा’ची सफर कराच

Wardha : वाघांसह इतर दुर्मिळ प्राणी पहायचेत? मग ‘बोर व्याघ्र प्रकल्पा’ची सफर कराच

X
फाईल

फाईल फोटो

बोर अभयारण्याला ऑगस्ट 2014 मध्ये व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला. बोर व्याघ्र प्रकल्प हा देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प असून मध्य भारतासह देशाच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटक या प्रकल्पाला भेट देत असतात. बोर व्याघ्र प्रकल्पात वन्य प्राण्यांसह फुलांच्या विविध वनस्पती तसेच पक्षांसाठी विविध ऋतूमध्ये आवश्यक असणारे खाद्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.

पुढे वाचा ...

    वर्धा, 24 जून : महाराष्ट्रात एकूण सहा व्याघ्र प्रकल्प असून त्यातील पाच विदर्भात आहेत. बोर व्याघ्र प्रकल्प  (Bor Tiger Project) त्यातील एक. वर्धा जिल्हा मुख्यालयापासून 40 किमी अंतरावर हा प्रकल्प आहे. बोर व्याघ्र प्रकल्प आकाराने लहान असला तरी जैवविविधतेने संपन्न आणि वन्यप्राण्यांचा (Wild animals) उत्तम अधिवास असलेले ठिकाण आहे. वाघासह इतर वन्यप्राण्यांचा इथं अधिवास पाहायला मिळत असल्यानं हे व्याघ्र प्रकल्प पर्यटकांच आकर्षक केंद्र बनलेलं आहे. बोर व्याघ्र प्रकल्पात आढणारे प्राणी, प्रकल्पाचे वैशिष्ट्ये या विशेष रिपोर्टमधून पाहूया.

    विदर्भातील बहुतेक जिल्हे विपुल वनसंपदा आणि जलसाठे लाभलेले जिल्हे आहेत. वर्धा जिल्हा मुख्यालयापासून 40 किमी अंतरावर बोर व्याघ्र प्रकल्प असून याच प्रकल्पात सेलू तालुक्यातील बोरी गावाजवळील बोर नदीवर बोर धरण बांधण्यात आलेलं आहे. धबधबे, नद्या, धरणं आणि जलसाठे ज्यांना पाहयाला आवडतात अशा पर्यटकांसाठी हे ठिकाण अतिशय नयनरम्य आहे. हे वनक्षेत्र राखीव असल्यानं आणि विस्तीर्ण जलसाठा असल्यानं पर्यटकांसाठी आकर्षण ठरतं. व्याघ्र प्रकल्पात प्रवेश केल्यानंतर आजुबाजुला घनदाट विस्तारलेलं जंगल आणि डोंगरमाथ्यासह रिमझिम पडणाऱ्या पावसाचा आस्वाद घेत पर्यटक बोर धरणावर येऊन विसावतात.

    वाचा : Success Story : ‘रोशनी’च्या यशाने उजाळली घरकाम करणाऱ्यांची 10 बाय 10ची खोली, आईच्या डोळ्यात पाणी!

    2014 मध्ये व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा

    बोर अभयारण्याला ऑगस्ट 2014 मध्ये व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला. बोर व्याघ्र प्रकल्प हा देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प असून मध्य भारतासह देशाच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटक या प्रकल्पाला भेट देत असतात. बोर व्याघ्र प्रकल्पात वन्य प्राण्यांसह फुलांच्या विविध वनस्पती तसेच पक्षांसाठी विविध ऋतूमध्ये आवश्यक असणारे खाद्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.

    प्रकल्पात 6 ते 10 वाघ

    बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये 185 प्रकरणांच्या विविध पक्षांची नोंद झालेली आहे.  प्रकल्प आकाराने लहान असला तरी यात जैवविविधता पहायला मिळते. या प्रकल्पात वाघ, बिबट, अस्वल, रानकुत्रे, सांभर, चितळ, रोही इत्यादी वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. प्रकल्पात 6 ते 10 वाघ आणि त्यांचे पिल असल्याचं येथील गाईड सांगतात.

    वाचा : Success Story : संसार सांभाळत नाशिकच्या नीलाक्षी लोही ठरल्या ‘मिसेस वेस्ट इंडिया’च्या विजेत्या, अशी घेतली मेहनत, पहा VIDEO

    सफारीसाठी गाड्यांची सोय 

    व्याघ्र प्रकल्पातूनच वाहणाऱ्या बोर नदीवर सिंचन प्रकल्प आहे. बोर धरण प्रवेशद्वारावरच पर्यटकांसाठी पर्यटक माहिती केंद्र असून येथूनच बोर व्याघ्र प्रकल्पाला भेटीसाठी परवानगी देण्यात येते. तसंच सफारीसाठी गाड्यांची सोय आहे. जंगल भ्रमंतीसाठी चारचाकी वाहनास परवानगी दिली जात असून प्रवासी वाहन, व्यक्ती आणि वनविभागाचा वनरक्षक यासाठी रितसर शुल्क भरून परवानगी देण्यात येते. या शुल्कात जर आपण सोमवार ते शुक्रवार जात असलं तर सहा व्यक्तीसाठी 4 हजार 375 रुपये भरावे लागतात. यासोबत तुम्हाला 1 गाईड ही मिळतो. तर विकेंडला म्हणजेच शनिवारी व रविवारी तुम्हाला 6 हजार शुल्क आकारला जातो. पर्यटकांना दररोज सकाळी 6 ते 11 व दुपारी 2 ते 6 पर्यंत जंगल पर्यटनांचा आनंद घेणे सुलभ झाले आहे.

    Bor Tiger Reserve

    गुगल मॅपवरून साभार

    कसे पोहोचाल?

    बोर व्याघ्र प्रकल्पात जाण्यासाठी वर्धा बस स्थानकावरुन बस सेवा आहे. तसेच नागपूर तुळजापूर हायवे वरुन सेलुपासून आतमध्ये 15 किमी अंतरावर बोर गावालगत प्रकल्पात जाण्यासाठी वनसंरक्षक विभागकडून गाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांसाठी नागपूर हे सर्वात जवळचे घरगुती विमानतळ आहे जे मुंबई, पुणे आणि नियमित आंतरराष्ट्रिय उड्डाणे असलेल्या अन्य भारतीय विमानतळांशी जोडलेले आहे. नागपूरने वायुवरून पोहोचतांना वर्धाला त्यांच्या वैयक्तिक पसंतीनुसार रेल्वे किंवा रस्त्याने पोहोचता येते. तसचे वर्धा हे बोर वन्यजीव अभयारण्याकरिता सर्वात जवळचे रेलवे स्टेशन आहे आणि थेट मुंबई, पुणे, नागपूर आणि इतर शहरांशी जोडलेले आहे. वर्धा सहजपणे गाडीने पोहचता येते आणि वर्धापासून पर्यटक हिंगणीकडे जाण्यासाठी रस्त्यावर प्रवास करून नंतर अभयारण्यसाठी पर्यटन कार आणि जीप लावतात.

    First published:
    top videos

      Tags: Tiger, Wardha news