मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : तब्बल 2.50 लाख विद्यार्थ्यांनी उपस्थितांच्या मनात पेटविला राष्ट्राभिमान!, VIDEO

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : तब्बल 2.50 लाख विद्यार्थ्यांनी उपस्थितांच्या मनात पेटविला राष्ट्राभिमान!, VIDEO

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून जिल्ह्यात एकाचवेळी सामूहिक राष्ट्रगान उपक्रम पार पडला. या उपक्रमात 2.50 लाख विद्यार्थी तसेच 7 हजार शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते.

    वर्धा, 09 ऑगस्ट :स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (Azadi Ka Amrit Mahotsav) आज मंगळवारी विभागीय क्रीडा संकुलात जवळपास 4 हजार विद्यार्थ्यांच्या समूह राष्ट्रगीत (National Anthem) गायनाने उपस्थितांच्या मनात राष्ट्राभिमान पेटविला. समूह राष्ट्रगीत गायनाच्या उपक्रमात जिल्ह्यातील तब्बल 2.50 लाख विद्यार्थी, सात हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. हेही वाचा- उस्मानाबादी रसदार गुलाबजाम, पाहताच तोंडाला सुटेल पाणी शहरी व ग्रामीण भागात विविध उपक्रम राबवून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा जागर केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सामूहिक राष्ट्रगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांची उपस्थिती होते. या उपक्रमात विविध सामाजिक संघटनेच्या प्रतिनिधींसह नागरिकांनी सहभागी झाले होते. हेही वाचा- दुष्काळी भागात फुलवली ‘फळबाग’; आता शेतीतून लाखोंची कमाई, पाहा VIDEO विद्यार्थी शालेय गणवेशात या उपक्रमात सहभागी झाले होते. एनसीसी, स्काउट-गाइड व हरित सेनेचे छात्रसैनिकही त्यांच्या गणवेशात सहभागी होते. वर्धा येथील क्रीडा संकुलात एक हजार कर्मचारी आणि तब्बल 4000 हजार विद्यार्थी सहभागी होते. तर जिल्ह्यातील तब्बल 2.50 लाख विद्यार्थी, सात हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. आज मंगळवारी सकाळी 11 वाजता या राष्ट्रगीताचे आयोजन करण्यात झाले. नागरिकांनीही या उपक्रमात सहभाग नोंदवला, अशी माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर यांनी दिली.
    First published:

    Tags: Wardha, Wardha news

    पुढील बातम्या