मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शेतकऱ्यांनो, तुमच्यासाठी खास स्पर्धा; 50 हजार रूपये जिंकण्याची संधी! VIDEO

शेतकऱ्यांनो, तुमच्यासाठी खास स्पर्धा; 50 हजार रूपये जिंकण्याची संधी! VIDEO

प्रयोगशील शेतकऱ्यांना उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागामार्फत पीक स्पर्धेच आयोजन केले आहे. शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत घेऊन राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावरील बक्षिसे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

पुढे वाचा ...
वर्धा, 08 ऑगस्ट : पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागामध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग केले जातात. यातून खर्च कमी आणि उत्पादन जास्त मिळवता येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव करण्यासाठी कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा (Crop Competition) योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत घेऊन राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावरील बक्षिसे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पीक स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर यांनी केले आहे.  पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकरी आता शेतात विविध प्रयोग करू लागला आहे. याद्वारे खर्च कमी होऊन उत्पादकतेत वाढ होत आहे. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देण्यात यावे. विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होईल. तसेच शेतकरी अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करतील. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होईल. यासाठी राज्यात कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. 11 पिकांचा या स्पर्धेत समावेश असून अर्ज करण्यासाठी 31ऑगस्ट अंतिम मुदतवाढ आहे. स्पर्धेसाठी 11 पिकांचा समावेश खरीप हंगामासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सुर्यफुल या अकरा पिकाचा स्पर्धेत समावेश असणार आहे. हेही वाचा- दुष्काळी भागात फुलवली ‘फळबाग’; आता शेतीतून लाखोंची कमाई, पाहा VIDEO गटांनुसार स्पर्धक संख्या प्रती तालुका किमान स्पर्धक संख्या सर्वसाधारण गटासाठी 10 व आदिवासी गटासाठी 5 असणार आहे. पीक स्पर्धेत सहभागी लाभार्थ्याचे शेतावर त्या पिकाखाली 10 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतरच संबंधित पिकाची पीकस्पर्धा संबंधित तालुका कृषी अधिकारी जाहीर करतील. तालुक्यात पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या सर्वसाधारण गटासाठी 5 व आदिवासी गटासाठी 4 राहील.  हेही वाचा- उस्मानाबादी रसदार गुलाबजाम, पाहताच तोंडाला सुटेल पाणी 31 ऑगस्ट अंतिम मुदत स्पर्धेत सहभाग नोंदविणाऱ्या शेतकऱ्यांना एकाचवेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी प्रवेश शुल्क सर्व गटासाठी पिकनिहाय प्रत्येकी 300 रुपये असून भात, ज्वारी, नाचणी, बाजरी, मका, तूर, सोयाबीन व भुईमूग पिकासाठी 31 ऑगस्ट अंतिम मुदत आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी विहित नमुन्यात अर्ज भरून प्रवेश शुल्क चलन, 7/12, 8 अ उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) अर्जासोबत कृषी कार्यालयास सादर करावे. स्पर्धेतील विजेत्यांना विविध बक्षिसे पीक स्पर्धेतील विजेत्यांना तालुका पातळीवर प्रथम 5 हजार रुपये, द्वितीय 3 हजार रुपये व तृतीय 2 हजार रुपये, जिल्हा पातळीवर प्रथम 10 हजार रुपये, द्वितीय 7 हजार रुपये व तृतीय 5 हजार रुपये, विभाग स्तरावर प्रथम 25 हजार रुपये, द्वितीय 20 हजार रुपये व तृतीय 15 हजार रुपये आणि राज्य स्तरावर प्रथम 50 हजार रुपये, द्वितीय 40 हजार रुपये व तृतीय 30 हजार रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली.
First published:

Tags: Farmer, Wardha, Wardha news, शेतकरी

पुढील बातम्या