मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिक्षकांचा मद्यपान करुन मुलींना मारहाण, शिक्षिकांना अश्लील मेसेजचा आरोप, गोंदियात नेमकं चाललंय काय?

शिक्षकांचा मद्यपान करुन मुलींना मारहाण, शिक्षिकांना अश्लील मेसेजचा आरोप, गोंदियात नेमकं चाललंय काय?

आदिवासी आश्रम शाळेतील मुख्यध्यापकाने शाळेतील दोन शिक्षकांना विनाकारण मुलींना मारणे, डेस्कवर उभे करणे, तसेच मुलींच्या आणि शिक्षिकांच्या अनेक तक्रारींमुळे दोन शिक्षकांना कार्यमुक्त केले आहे.

    रवी सपाटे, प्रतिनिधी गोंदिया, 9 जुलै : गोंदिया (Gondia) जिल्ह्याच्या देवरी प्रकल्प अधिकारी कार्यलयाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या बोरगाव आदिवासी आश्रम शाळेतील मुख्यध्यापकाने शाळेतील दोन शिक्षकांना घरचा रस्ता दावला आहे. विनाकारण मुलींना मारणे, डेस्कवर उभे करणे, मुख्यध्यापकाने दिलेले कामे पूर्ण न करणे, तसेच मुलींच्या आणि शिक्षिकांच्या अनेक तक्रारींमुळे मुख्यध्यापकांनी दोन शिक्षकांना कार्यमुक्त केले आहे. तर प्रक्लप अधिकऱ्यांनी याच शिक्षकांना दोन दिवसात चौकशीसाठी हजर होण्याचे आदेश दिले होते. पण दोन्ही शिक्षक शाळेत रुजू न होता राजकारण करीत असल्याचा आरोप प्रकल्प अधिकारी विकास रानचेलवार यांनी केला आहे. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुका हा आदिवासी नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे आदिवासी प्रकल्प कार्यालय देवरी येथेच आहे. तर देवरीपासून काही किलोमीटर अंतरावर बोरगाव येथे आदिवासी आश्रम शाळा आहे. या आश्रम शाळेतील शिक्षक सुनील ढेंगळे आणि कुलचंद खांडवाहे यांना प्रवेश उत्सवासात गावातील 10 मुलींना शाळेत अॅडमिशन करून घेण्याची जबाबदारी शाळेतील मुख्याध्यापक नरेंद्र भाकरे यांनी दिली होती. मात्र दोघांनी फक्त एकाच मुलीला प्रवेशाकरिता घेऊन आले. तसेच हे दोन्ही शिक्षक शाळेतील मुलींना विनाकारण मारहाण करून डेस्कवर उभे करीत असल्याचा देखील तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ('संजय राऊतांना मातोश्रीने बाजुला करावं, अजूनही शिवसेना एकत्र येऊ शकते', विजय शिवतारेंचं मोठं विधान) याआधी देखील या दोन्ही शिक्षकांनी शाळेतील शिक्षिकांना मद्यपान करून म्यासेज करून त्रास देणे असे अनेक आरोप या शिक्षकांवर असल्याने यांच्या जाचाला कंटाळून दोन्ही शिक्षकांना मुख्यध्यापक भाकरे यांनी आपले अधिकार बजावीत शाळेतून कार्यमुक्त करीत प्रकल्प अधिकारी कार्यलयात जमा होण्याचे आदेश दिले होते. तर या दोन्ही शिक्षकांना नोटीस बजावीत पुन्हा शाळेत रुजू होण्याचे आदेश प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी दिले होते. मात्र ही शाळा मुलींची शाळा असल्याने मुलींच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाला आहे. दुसरीकडे आमच्यावर खोटे आरोप मुख्यध्यापकाने केला असल्याचा आरोप कार्यमुक्त झालेल्या शिक्षकांनी केला आहे. तसेच मुख्यध्यापक आम्हाला मानसिक त्रास देतात, असेही शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आदिवासी प्रकल्प विभाग या शिक्षकांची चौकशी करून कोणती कार्यवाही करते हे महत्त्वाचं आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Crime, Maharashtra News

    पुढील बातम्या