मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

दाल मीलमध्ये 16 वर्षांच्या मुलाचा झाला मृत्यू पण व्यस्थापकांनी केलं भयानक कृत्य

दाल मीलमध्ये 16 वर्षांच्या मुलाचा झाला मृत्यू पण व्यस्थापकांनी केलं भयानक कृत्य

 या दालमिलमध्ये बिहार राज्यातील दरभंगा येथील प्रभासकुमार यादव (16) हा अल्पवयीन मुलगा कामाला होता

या दालमिलमध्ये बिहार राज्यातील दरभंगा येथील प्रभासकुमार यादव (16) हा अल्पवयीन मुलगा कामाला होता

या दालमिलमध्ये बिहार राज्यातील दरभंगा येथील प्रभासकुमार यादव (16) हा अल्पवयीन मुलगा कामाला होता

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Wardha, India
  • Published by:  sachin Salve

नरेंद्र मते, प्रतिनिधी

वर्धा, 04 डिसेंबर : हिंगणघाट येथील कडाजना शिवारातील दालमिलमध्ये काम करणाऱ्या बालकामगाराचा हौदात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, मिल व्यवस्थापकाने याची कुणालाही माहिती न देता मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याचे उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून मिल व्यवस्थापक फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कडाजना शिवारात मानधनिया दाळमिल आहे. या दालमिलमध्ये बिहार राज्यातील दरभंगा येथील प्रभासकुमार यादव (16) हा अल्पवयीन मुलगा कामाला होता. मीलमध्ये काम करत असताना अचानक प्रभासकुमार यादव हा मील परिसरातील हौदामध्ये पडला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.

( मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, पत्नी आणि मुलांच्या डोळ्यादेखत वडिलांचा मृत्यू)

पण मृत्यूची माहिती मृताच्या परिवाराला न देता मिल व्यवस्थापनाने मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली. याची माहिती मिळाल्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि पाहणी केली. त्यानंतर या प्रकरणी मील व्यवस्थपकांविरोधात गुन्हा दाखल करुन कामगार अशोक पुडिया, कंत्राटदार अजित यादव आणि पर्यवेक्षक दिलीप असलकर या तिघांना अटक केली.

(पगार मागितल्यानं मालकाला राग अनावर; कामगारासोबत धक्कादायक कृत्य, पोलिसांकडून आरोपीचा शोध)

या तिघांनाही हिंगणघाट येथील न्यायालयात हजर केले असता 4 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दाळमिल व्यवस्थापक व संचालक मिलला टाळे ठोकून पसार झाले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

First published:

Tags: Marathi news