मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Wardha News: हरभरा विक्रीला ब्रेक, 9.5 हजार शेतकऱ्यांना SMS ची प्रतीक्षा

Wardha News: हरभरा विक्रीला ब्रेक, 9.5 हजार शेतकऱ्यांना SMS ची प्रतीक्षा

वर्धा जिल्ह्यातील शेतकरी हरभऱ्याला दर नसल्यामुळे अडचणीत आहेत. 9 हजार 502 शेतकरी हरभरा विक्रीसाठी SMS च्या प्रतीक्षेत आहेत.

वर्धा जिल्ह्यातील शेतकरी हरभऱ्याला दर नसल्यामुळे अडचणीत आहेत. 9 हजार 502 शेतकरी हरभरा विक्रीसाठी SMS च्या प्रतीक्षेत आहेत.

वर्धा जिल्ह्यातील शेतकरी हरभऱ्याला दर नसल्यामुळे अडचणीत आहेत. 9 हजार 502 शेतकरी हरभरा विक्रीसाठी SMS च्या प्रतीक्षेत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Wardha, India

    वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी

    वर्धा, 31 मार्च : सध्या शेतकरी दुहेरी संकटात अडकला आहे. अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच शेती मालालाही भावच मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळलं आहे. वर्धा जिल्ह्यातील हरभरा बाजारात आला आहे. मात्र खुल्या बाजारात कमी भाव मिळत असल्याने शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. आता शासकीय खरेदी सुरू झाली मात्र 10 हजारांपैकी तब्बल 9 हजार 502 शेतकऱ्यांना एसएमएसची प्रतिक्षा आहे.

    सरकारी खरेदीसाठी नोंदणी आवश्यक

    हरभऱ्याच्या सरकारी खरेदीसाठी नोंदणी आवश्यक आहे. त्यासाठी 31 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. 27 मार्चपर्यंत 9 हजार 995 शेतकऱ्यांनी यासाठी नोंदणी केली आहे. मात्र हरभरा विक्रीसाठी केवळ 493 शेतकऱ्यांना एसएमएस पाठवण्यात आले आहेत. चार केंद्रांवर शेतकऱ्यांच्या वतीने 4 हजार 792.61 क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे.

    जिल्ह्यात आठ केंद्रावर नोंदणी

    केंद्र शासनाच्या वतीने नाफेडला हरभरा विकण्यासाठी जिल्ह्यातील आठ केंद्रांवर शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येत आहे. वर्धा केंद्रात 1 हजार 696, देवळीत 1 हजार 35, पुलगावमध्ये 538, कारंजा येथे 722, आष्टीमध्ये 1 हजार 188, हिंगणघाटमध्ये 2 हजार 175, समुद्रपूरमध्ये 1 हजार 990 आणि जाममध्ये 962 अशाप्रकारे 9 हजार 995 शेतकऱ्यांनी रेंगाळले आहे. मात्र केवळ 493 शेतकऱ्यांनाच हरभरा विकण्याचा संदेश देण्यात आला आहे. वर्धा बाजार समितीतील 39 शेतकऱ्यांकडून 741.40 क्विंटल, हिंगणघाट येथील 97 शेतकऱ्यांकडून 1 हजार 965.30 क्विंटल, समुद्रपूर येथील 85 शेतकऱ्यांकडून 1 हजार 579 क्विंटल आणि जाम केंद्रावर 25 शेतकऱ्यांकडून 506.81 क्विंटल तुरीची आवक झाली आहे. दुसरीकडे, देवळी, पुलगाव केंद्रावर सोमवार, 27 मार्चपासून हरभरा खरेदी सुरू झाली आहे.

    70 रु. किलो, वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्याने पिकवला काळा गहू; साधा गहू अन् यात काय आहे फरक?

    बारदाना संकट निर्माण केले

    खरेदी केंद्रावरील गतवर्षीच्या गोण्यांना हिरवी किनार आहे. पण ते वापरू नका. हिरव्या ऐवजी लाल कडा असलेल्या बारीक पिशव्या वापरा. अशा माहितीमुळे हरभरा खरेदीत बारदाना अडचणी निर्माण झाल्या आहेत. गतवर्षीचा हिरवा पट्टा एक लाख बारदाना शिल्लक आहे.

    व्यापारी कमी भाव देत आहेत

    जिल्ह्यात हरभरा या रब्बी पिकाची काढणी झाली आहे. सध्या मोजक्याच शेतकऱ्यांच्या शेतात हरभरा पीक आहे. त्यामुळे बाजारात हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे. सरकारने 5 हजार 335 रुपये आधारभूत किंमत जाहीर केली आहे. मात्र व्यापारी केवळ 4 हजार 200 ते 4 हजार 500 रुपये देत आहेत. नाफेडकडे हरभरा विक्रीसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली आहे. त्यामुळे खरेदीचा वेग वाढविण्याची मागणी होत आहे.

    First published:
    top videos

      Tags: Agriculture, Local18, Wardha, Wardha news