मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Wardha : 16 हजार 557 विद्यार्थ्यांच्या धाकधूक वाढली, आज दहावीचा ऑनलाईन रिझल्ट

Wardha : 16 हजार 557 विद्यार्थ्यांच्या धाकधूक वाढली, आज दहावीचा ऑनलाईन रिझल्ट

दहावीचा निकाल कधी लागणार याची सर्वांना उत्सुकता होती. ती उत्सुकता आता संपली असून दहावीचा निकाल आज शुक्रवारी 17 जून रोजी (Maharashtra SSC board exam 2022 result date announced) लागणार असून जिल्ह्यातील 16 हजार 557 विद्यार्थ्यांच्या धाकधूक वाढली आहे.

पुढे वाचा ...
वर्धा, 17 जून : कोरोना महामारीच्या अडथळ्यामुळं राज्यातील शाळा कॉलेजेस गेल्या दोन वर्षांपासून बंद होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यात आला. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांचा निकाल विशेष मुल्यांकन पद्धतीनं लावण्यात आला. यंदा बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं (Offline Board Exams) घेण्यात आल्या. त्यानंतर बारावीचा निकाल 8 जून रोजी लागला. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याची सर्वांना उत्सुकता होती. ती उत्सुकता आता संपली असून दहावीचा निकाल आज शुक्रवारी 17 जून रोजी (Maharashtra SSC board exam 2022 result date announced) लागणार असून जिल्ह्यातील 16 हजार 557 विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे. वाचा- बीडच्या मुलांनो इकडे लक्ष द्या! इथल्या ITI मध्ये 1-2 वर्षांचा कोर्स संपताच, लगेच लागतो जाॅब, वाचा SPECIAL REPORT यावेळी 15 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत दहावी बोर्डाच्या परीक्षा घेण्यात आल्या. जिल्ह्यातील 263 केंद्रांवर एकूण 16 हजार 557 विद्यार्थ्यांची परिक्षेसाठी नोंदणी झाली होती. परीक्षा संपताच विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला, माध्यमिक प्रमाणपत्राचा निकाल गतवर्षी चांगला होता. त्याची टक्केवारी 99.95 इतकी नोंदवली गेली होती, गतवर्षी केवळ 7 विद्यार्थी नापास झाले होते, सुमारे 6 हजार 378 विद्यार्थी गुणवत्ता श्रेणीत आले होते, मात्र अनेक पालकांनी ऑनलाइन परीक्षेबाबत नाराजी व्यक्त केली होती. असा चेक करा निकाल इयत्ता 10वीचा महाराष्ट्र SSC निकाल तपासण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी सुरुवातीला www.mahresult.nic.in या महाराष्ट्र बोर्डाच्या निकाल पोर्टलच्या अधिकृत वेबपेजला भेट द्या. SSC परीक्षेसाठी MSBSHSE निकालासाठी अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर SSC परीक्षेचा निकाल हा पर्याय येईल ज्यावर विद्यार्थ्यांना पुढील वेब पेजवर भेट देण्यासाठी क्लिक करा. यानंतर आईचे नाव आणि रोल नंबर ही महत्त्वाची क्रेडेन्शियल्स टाकण्यास विसरू नका. विद्यार्थ्यांना दोन्ही आवश्यक क्रेडेन्शियल्स भरावे लागतील आणि नंतर View Result पर्यायावर क्लिक करा. तुमचा निकाल तुमच्या समोर असेल. पुढील रेफरन्ससाठी निकाल डाउनलोड किंवा सेव्ह करून ठेवा.
First published:

Tags: Board Exam, Exam Fever 2022, Exam result, Ssc board, State Board

पुढील बातम्या