मोदींना पत्र लिहिणाऱ्या वर्ध्याच्या विद्यार्थ्यांचं निलंबन : आता जातीवरून नवा वाद

मोदींना पत्र लिहिणाऱ्या वर्ध्याच्या विद्यार्थ्यांचं निलंबन : आता जातीवरून नवा वाद

मॉब लिंचिंगसारख्या घटनांमध्ये वाढ होतेय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या विद्यार्थ्यांनी पत्र लिहिलं. धरणं आंदोलनही केलं. म्हणून त्यांना निलंबित केल्याचं बोललं जात आहे. पण या प्रकरणाला नवं जातीय वळण लागण्याची शक्यता आहे.

  • Share this:

वर्धा, 12 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra assembly election 2019) आचारसंहितेचा (election code of conduct) भंग केला म्हणून आणि कायदेशीर प्रक्रियेत बाधा आणल्याच्या आरोप ठेवून वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या (Mahatma Gandhi Antarrashtriya Hindi Vishwavidyalaya) 6 विद्यार्थ्यांना कुलसचिवांनी निलंबित केलं. मॉब लिंचिंगसारख्या घटनांमध्ये वाढ होतेय या आणि अशा इतर काही मुद्द्यांसह या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं. त्यांनी धरणं आंदोलनही केलं. म्हणून त्यांना निलंबित केल्याचं बोललं जात आहे. पण या प्रकरणाला नवं जातीय वळण लागण्याची शक्यता आहे.

वर्ध्याच्या या विद्यापीठाला सेंट्रल युनिव्हर्सिटीचा दर्जा आहे. या विद्यापीठात आचारसंहिता भंगाचं कारणं देऊन विद्यार्थ्यांना निलंबित केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. निलंबित झालेल्या एका विद्यार्थ्यानं केवळ दलित आणि ओबीसी विद्यार्थ्यांवरच कारवाई केली असल्याचा आरोप केला आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार, चंदन सरोज या निलंबित झालेल्या एका विद्यार्थ्यानं असा आरोप केला आहे.

वाचा - पोलिसाने रशियन मॉडेलवर केला 12 वर्ष बलात्कार; भाऊ-बहिणीलाही संपवलं?

धरणे आंदोलनात 100 च्या वर विद्यार्थी सामील होते, पण निलंबनाची कारवाई फक्त मोजक्या 6 जणांवर करण्यात आली. त्यापैकी 3 दलित आणि 3 ओबीसी आहेत. आमच्याबरोबर आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये इतर कथित उच्च जातीचे विद्यार्थीसुद्धा होते, असा दावा सरोजने केला आहे.

चंदन सरोज, नीरज कुमार, राजेश सारथी, रजनीश आंबेडकर, पंकज वेला, वैभव पिंपळकर या सहा विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. डाव्या विद्यार्थी संघटनेच्या AISA या प्रातिनिधिक संघटनेनं या निलंबनाचा निषेध केला आहे.

वाचा - एकनाथ खडसेंवर अन्याय करणाऱ्या भाजपला धडा शिकवू, लेवा पाटील समाजाचे पत्र व्हायरल

तबरेज अन्सारीचं मॉब लिंचिंग, भीमा कोरेगावमध्ये झालेला दलितांवरचा हल्ला याविरोधात दाद मिळालीच पाहिजे. भाजपच्या कुलदीप सेंगर आणि चिन्मयानंद यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही या संघटनेनं केली आहे. यासंदर्भातच धरणे आंदोलन होतं.

निलंबनाचं समर्थन करताना विद्यापीठाचे कुलहुरू कृष्णकुमार सिंह म्हणाले, "निवडणूक आचारसंहिता सुरू असताना निदर्शनं आणि निषेध करणाऱ्या गटांवर कारवाई केली आहे. आमचं निलंबनाचं पत्र स्पष्ट आहे."

वाचा - चंद्रकांत पाटलांचा दणका, 14 जणांची पक्षातून हकालपट्टी

विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की, पंतप्रधानांना पत्र लिहिण्याची परवानगी त्यांना नाकारण्यात आली आणि आचारसंहितेचा कुठलाही उल्लेख कारवाईदरम्यान नव्हता. कांशीराम यांचा स्मृतिदिनाचा कार्यक्रम करण्यावरूनही कारवाई झाल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. हा कार्यक्रम करण्याची परवानगी त्यांना नाकारण्यात आली होती.

-----------------------------

अन्य बातम्या

खळबळजनक! गुजरात सीमेजवळ सापडल्या पाकिस्तानी नौका

'370चं भांडवल करणारे 371 वर गप्प का?' शरद पवारांचा अमित शाहांना सवाल

मित्रांनी ग्रुप सेक्ससाठी केलं ब्लॅकमेल, 12वीच्या विद्यार्थिनीनं केली आत्महत्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2019 06:25 PM IST

ताज्या बातम्या