मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अपघातानंतर कंपनीला भेट देण्यासाठी गेलेल्या बच्चू कडू यांनी दिला कडक इशारा

अपघातानंतर कंपनीला भेट देण्यासाठी गेलेल्या बच्चू कडू यांनी दिला कडक इशारा

'शासनाच्या वतीने चौकशी अहवालात अपघातास कंपनी दोषी आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.'

'शासनाच्या वतीने चौकशी अहवालात अपघातास कंपनी दोषी आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.'

'शासनाच्या वतीने चौकशी अहवालात अपघातास कंपनी दोषी आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.'

वर्धा, 6 फेब्रुवारी : 'कंपनी व्यवस्थापनांनी अपघाताची चौकशी करुन व्यवस्थापक चौकशीत दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा शासनाच्या वतीने चौकशी अहवालात अपघातास कंपनी दोषी आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. तसंच औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागांनी कारखान्याचा परिक्षण अहवाल तयार करावा,' अशा सूचना कामगार, जलसंपदा लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कारखान्यातील अपघात स्थळाला भेट देतांना औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाच्या उपसंचालकांना केल्या.

3 फेब्रुवारीला उत्तम गलवा येथील फरनेसमधील गरम हवा व राख अंगावर येऊन झालेल्या अपघातस्थळाची बच्चू कडू याांनी पाहणी केली. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या उपसंचालक पल्लवी गोंपावार, उत्तम गलवा कंपनीचे जनसंपर्क अधिकारी आर.के. शर्मा उपस्थित होते.

हेही वाचा - भाजपला मुंबईत धक्का, 3 वेळा आमदार राहिलेल्या नेत्याने केला शिवसेनेत प्रवेश

बच्चू कडू यांनी श्रीमती गोंपावार यांना कंपनी सुरक्षा विषयक तात्काळ परीक्षण अहवाल तयार करावा त्यासोबतच कंपनीमध्ये किती धोकादायक युनिट आहे, तसंच त्यामध्ये किती कामगार कार्यरत असतात याची नोद संबधित युनिटमध्ये असणे आवश्यक आहे. काम करणाऱ्या या कामगारांना कुठल्याही प्रकारचे सुरक्षा जॅकेट पुरविण्यात आलेले नाही, फरनेसची देखभाल करण्याकरीता फरनेस बंद केल्यावर कामगारांना पूर्व सूचना देणे आवश्यक आहे. या सर्व बाबींचा अहवाल तयार करुन तात्काळ शासनाला सादर करावा त्यासोबत अहवालाची प्रत पोलीस विभागांना द्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

कंपनीतील कामगारांना पोषाख पुरवण्यात यावे, त्याचबरोबर सुरक्षा रक्षकाकडे असलेल्या लाकडी काठ्या बदलून फायबरच्या काठ्या सुरक्षा कंपनीने पुरवाव्यात, अशा सूचना बच्चू कडू यांनी केल्या.

First published:

Tags: Wardha, Wardha news