शेतात गेलेल्या आई आणि मुलाचा निर्घृण खून, दुहेरी हत्याकांडाने खळबळ

शेतात गेलेल्या आई आणि मुलाचा निर्घृण खून, दुहेरी हत्याकांडाने खळबळ

पुलंगाव पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

  • Share this:

वर्धा, 20 मार्च: वर्ध्यातील पुलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या निमगव्हाण येथील दुहेरी हत्याकांडाची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आली. शेतातील धुऱ्यावर अज्ञाताने आई आणि मुलाची हत्या केली. यात डोक्यावर आणि शरीरावर जखमा आहे. पुलंगाव पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

जनाबाई नीलकंठ राऊत आणि मुलगा सुरेंद्र असं मृतकांची नावे आहेत. दोघेही नियमित शेतातील कामानिमित्त जात होते. गुरुवारी दुपारी सुद्धा शेतात गेले पण घरी परतले नाहीl. मृतक महिलेचा मोठा मुलगा हा शिक्षक असून तो पुलंगावला राहतो. त्याला एकाने तुझी आई आणि भाऊ शेतात पडून असल्याचे सांगितले.

हेही वाचा- परदेशातून आलेले कोरोनाचे चार संशयित रुग्ण इगतपुरी येथून फरार

तेव्हा त्या मुलाने पुलगाव पोलिसांच्या मदतीने शेताकडे शोध घेण्यास सुरवात केली. त्यानंतर आपल्या आणि भावाची हत्या झाल्याचे उशिरा रात्री उघडकीस आले. यावेळी मृतदेहाची आणि घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह ग्रामीण रूग्णालयात शव विच्छेदनासाठी आणण्यात आले. या घटनेत शवविच्छेदन अहवालातून नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

First published: March 20, 2020, 5:05 PM IST
Tags:

ताज्या बातम्या