Home /News /maharashtra /

कोरोनाची अफवा ठरली बेरोजगारीचं कारण, मन हेलावून टाकेल वर्ध्यातील तरुणाची कहाणी

कोरोनाची अफवा ठरली बेरोजगारीचं कारण, मन हेलावून टाकेल वर्ध्यातील तरुणाची कहाणी

कोरोनामुळे बंद करावा लागला व्यवसाय, काय घडलं वर्ध्यातील तरुणासोबत वाचा सविस्तर.

    वर्धा, 02 मार्च : कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार पसरला आहे. या व्हायरसच्या विळख्यात अडकलेल्या चीनमध्ये तर आतापर्यंत 3 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोनशेहून अधिक नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. जगभरात या संसर्गजन्य रोगाबद्दल भीती निर्माण झाली असतानाच याचे अनेक मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. या मेसेजची सत्यता न पडताळता आपण अनेकदा तो डोळे झाकून फॉरवर्ड करतो त्यावर विश्वास ठेवतो. त्याची सत्यता पडताळत नाही. याचा फटका एका तरुणाला बसला आहे. कोरोना व्हायरसची लागण कोंबड्यांना झाल्याचा मेसेज गेल्या काही दिवस फिरत आहे. हा मेसेज तरुणापर्यंत पोहोचला आणि या तरुणाला याचा मोठा फटका बसला आहे. सोशल मीडियावरून आलेल्या या खोट्या मेसेजमुळे तरुणाचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. कोरोनाची लागण कोंबड्यांनाही झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली. याचा फटका वर्ध्यातील वायगावमधील प्रफुल्ल मोते यांना बसला आहे. प्रफुल्ल यांना त्यांच्या 6 हजार फुटात सुरू केलेल्या पोल्ट्रीफार्मचा व्यवसाय बंद करावा लागला. पोल्ट्री बंद केल्याने पोल्ट्री फार्ममध्ये काम करणारे काही जण बेरोजगार झाले आहेत. तर बँकेचे हप्ते कसे फेडायचे असा प्रश्न आता प्रफुल्ल यांना पडला आहे. हे वाचा-दिल्ली हिंसाचारानंतर आता मुंबईतही कलम 144 लागू चार वर्षांपूर्वी बारा लाख रुपये लोन घेऊन शेतातच सहा हजार फुटात पोल्ट्रीफॉर्म उभी केली. सर्व सुरळीत चालू असताना सोशल मीडियातून कोरोनाचा व्हायरस कोंबड्यानाही झाला आहे अशी अफवा त्यांच्यापर्यंत पोहोचली. 8 दिवसांवर होळी आहे आणि या दिवसांमध्ये चिकनला मोठ्या प्रमाणात मागणी असते. परंतु कोरोनाच्या भीतीमुळे कोणीच चिकन घ्यायला तयार नाहीत. परिणामी व्यवसायात मोठा तोटा सहन करावा लागला. सोशल मीडियातून येणाऱ्या अफवांमुळे चांगल्या सुरु असलेल्या व्यवसायात होत्याचं नव्हतं झालं. आज पोल्ट्री व्यवसाय बंद झाल्याने प्रफुल्ल यांच्यासह चार जण बेरोजगार झाले आहेत. तर बँकेचे हप्ते कसे भरायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. हे वाचा-'ती' झाली मोटरमन! बंगळुरू ते म्हैसूर चालवली राज्य राणी एक्स्प्रेस, पाहा VIDEO
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Viral message

    पुढील बातम्या