नरेंद्र मते (प्रतिनिधी),
वर्धा, 30 ऑक्टोबर: अनोळखी मृतदेह सापडल्यानंतर अवघ्या 48 तासांत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना हत्येचा गुंता सोडवण्यात यश मिळालं. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली.पत्नीवर वाईट नजर ठेवून मित्र अश्लिल कमेंट करत होता, याच रागातून आरोपी पतीनं त्याच्या दुसऱ्या मित्राच्या मदतीनं दगडानं ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
सोनेगाव शिवारात दोन दिवसापूर्वी एक आढळला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून दोन्ही मारेकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. अविनाश पुलझेले असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. निखील प्रभाकरराव ढोबळे (वय-28, रा. कवडघाट, हिंगणघाट) आणि सुधीर दिलीप जवादे (वय-35, रा. शास्त्री वॉर्ड, हिंगणघाट) अशी आरोपींची नावं आहे.
हेही वाचा...धुळ्यातील खळबळजनक घटना, आढळला महिलेचा अर्धवट पुरलेला मृतदेह!
सुधीर जवादे याच्या पत्नीवर अविनाशची वाईट नजर होती. अविनाश हा सुधीरच्या पत्नीबाबत कायम अश्लिल संवाद साधत होता. यामुळे संतापलेल्या सुधीर जवादे यांनी मित्र निखिल ढोबळे याच्या मदतीनं अविनाशची दगडानं ठेचून हत्या केली. दोन्ही आरोपींनी याबाबत पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुलीही दिली आहे.
काय आहे प्रकरण?
हिंगणघाट रस्त्यालगत सोनेगाव (स्टेशन) शिवारात प्रमोद महाजन यांच्या शेतात दोन दिवसांपूर्वी अनोळखी इसमाचा दगडाने ठेचून विद्रुप केलेला मृतदेह आढळला होता. याबाबत प्रमोद महाजन यांनी याबाबत अल्लीपूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली होती. त्यावरून पोलिसांनी भादंवि कलम 302, 201 अन्वये गुन्हा नोंदवत तपास सुरू केला होता. गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत असता हिंगणघाट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शास्त्री वॉर्डातील अविनाश राजू पुलझेले हा तरुण 27 ऑक्टोबरपासून घरी आला नसल्याची माहिती मिळाली. त्यावरून मृताच्या नातेवाईकांनी छायाचित्र आणि वर्णन सांगितल्यावरून मृतक अविनाश पुलझेले असल्याचे सांगण्यात आले. त्यावरून शोध घेतल्यानंतर तपासादरम्यान सुधीर जवादे आणि निखील ढोबळे या दोघांनी त्याची दगडाने ठेचून हत्या केल्याचे पुढे आले.
हेही वाचा...‘माझी चिमुकली गेली..’, आईने फोडला हंबरडा; सगळ्यांच्या काळजाचं झालं पाणी!
सुधीरच्या पत्नीवर वाईट नजर ठेवून असल्याच्या कारणातून त्याची हत्या केल्याचे या दोघांनी पोलिसांना सांगितल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या दोघांना पुढील कारवाईसाठी अल्लीपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.