नरेंद्र मते, प्रतिनिधीवर्धा, 8 मे: वर्धा (Wardha) जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंवस वाढत आहे. केवळ बाधितांची संख्या वाढत नाहीये तर कोरोनामुळे मृत्यू (death due to covid) होणाऱ्यांची संख्याही वेगाने वाढत आहे. कोविड बाधित मृतकांचे संस्कार आतापर्यंत मोफत करण्यात येत होते. मात्र, आता कोविड मृतकांच्या अंत्यसंस्कारासाठी (funeral of covid deceased) नातेवाईकांना शुल्क द्यावे (fees for funeral) लागणार आहे. नगरपालिकेच्या विशेष सभेत या संदर्भातील निर्णय झाला आहे.
वर्ध्यातील स्मशानभूमीत कोविड बाधित मृतकांवर यापूर्वी मोफत अंत्यसंस्कार करण्यात येत होते. तत्कालीन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी अंत्यसंस्काराचा खर्च जिल्हा प्रशासन उचलेलं असे आश्वासन दिले होते. मात्र, आता खर्च वाढत असल्याने पालिकेने नि:शुल्क सेवा देण्यास असमर्थता दर्शवली आहे.
अंत्यसंस्काराची जबाबदारी वसुधा संस्था सांभाळत असून 1 हजार 350 मृतदेहाच्या अंत्यसंस्कारावर सुमारे 33 लाख रुपयांवर रक्कम खर्च झाली आहे. नगरपालिकेने त्यातील 18 लाख 62 हजार रुपये दिलेत, अजून रक्कम देणे बाकी आहे. पण आता खर्च वाढत असल्याने पालिकेने खर्चास असमर्थता दर्शवली आहे. प्रशासनाने निधी दिल्यास निःशुल्क अंत्यसंस्कार सुरू ठेवण्याची तयारी सुद्धा दर्शवण्यात आली आहे.
वाचा: मोठा दिलासा! आज राज्यात तब्बल 82,266 रुग्णांची कोरोनावर मात; रिकव्हरी रेटही वाढलावर्ध्यातील वाढती रुग्णसंख्या चिंता वाढवणारी
जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता वाढवलीय. कठोर निर्बंध असतानाही जिल्ह्याच्या रुग्णासख्येची वाढ मोठ्या प्रमाणात आहे.मागील एका महिन्यात जिल्ह्यात तब्बल 20104 रुग्णांची वाढ झाली आहे तर 484 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.कोरोना नियंत्रणासाठी आता प्रशासन आणखी कठोर होत आहे.
वर्धा जिल्ह्यात मृतकांचा आकडाही मोठा
1 मे - 1192 रुग्ण, 44 मृत्यू
2 मे - 834 रुग्ण, 24 मृत्यू
3 मे - 1627 रुग्ण, 25 मृत्यू
4 मे - 649 रुग्ण, 25 मृत्यू
5 मे - 997 रुग्ण, 35 मृत्यू
6 मे - 905 रुग्ण, 25 मृत्यू
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.