दिवसा वीज द्या, नाहीतर आम्हाला जेलमध्ये टाका; शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन

दिवसा वीज द्या, नाहीतर आम्हाला जेलमध्ये टाका; शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन

धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनी रात्रपाळीत वीज पुरवठा करणार येणार आहे. मात्र, आम्हाला दिवसा वीज द्या आणि ते जमत नसेल तर आम्हाला जेलमध्ये टाका अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.

  • Share this:

संजय शेंडे, प्रतिनिधी, वर्धा, 4 नोव्हेंबर : धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनी रात्रपाळीत वीज पुरवठा करणार येणार आहे. मात्र, आम्हाला दिवसा वीज द्या आणि ते जमत नसेल तर आम्हाला जेलमध्ये टाका अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय. दिवसाच्या भारनियमनामुळे वैतागलेले शेतकरी शनिवारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडकले आणि त्यांनी आपला रोष व्यक्त केला. यावेळी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भारनियमनाचं वेळापत्रक बदलण्यास असमर्थता दर्शविल्याने आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केलं.

धामणगाव रेल्वे तालुक्यातील विरुळ, रोंघे, तरोडा, वडगांव यांसह अन्य गावांत नोव्हेंबर महिन्यात रात्रपाळीत वीज पुरवठा होणार असून, या गावातील शेतकऱ्यांना रात्रपळीमध्ये ओलित करावे लागणार आहे. या परिसरात वाघाची दहशत असून, आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झालाय. याशिवाय इतर वन्य प्राण्यांचाही हैदोस असल्यामुळे शेतकरी अधिकच त्रासले आहेत. अशातच वीज वितरण कंपनीनं या भागात रात्रपाळीमध्ये विद्युत पुरवठा करण्याचं नियोजन केलं असल्यामुळे, आधीच धास्तावलेल्या या भागातील शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. वीज वितरण कंपनी आपल्या निर्णयावर ठाम असल्यामुळे शेतकऱ्यांनी रविवारी आक्रमक पवित्रा घेत वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केलं.

तालुक्यात वाघाने दोन बळी घेतले असल्यामुळे परिसरात अजूनही भीतीचे वातावरण आहे. चंद्रपूर वरोरा या भागात दिवसा वीज पुरवठा केला जातोय. मग धामणगाव तालुक्यात दिवसा वीज पुरवठा करायला काय हरकत आहे? अशी भूमीका ठिय्या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतलीय. आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी आम्हाला दिवसा वीज पुरवठा करा, अन्यथा आम्हा सर्वांना जेल मध्ये टाका अशी मागणी केली.

 जोडप्याला पोलिसांनी बेदम मारलं, VIDEO झाला व्हायरल

First published: November 4, 2018, 6:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading