धक्कादायक! 8 वर्षांच्या चिमुकल्यासोबत अनैसर्गिक कृत्य करून पाण्याच्या टाकीत फेकलं

धक्कादायक! 8 वर्षांच्या चिमुकल्यासोबत अनैसर्गिक कृत्य करून पाण्याच्या टाकीत फेकलं

8 वर्षीय बालकावर अनैसर्गिक कृत्य करून त्याला पाण्याच्या टाकीत टाकल्याने त्याचा मृत्यू झाला.

  • Share this:

नरेंद्र मते, वर्धा, 6 जून : शहराच्या आनंदनगर पाकिजा कॉलनी परिसरात आठ वर्षाच्या चिमुकल्यावर अनैसर्गिक कृत्य करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, या मागणीसाठी शहर पोलीस ठाण्यात परिसरातील महिलांनी गर्दी केली होती. जमाव लक्षात घेऊन पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

वर्धा शहर पोलिस ठाण्यात अंतर्गत येणाऱ्या आनंदनगर पाकिजा नगर परिसरात 8 वर्षीय बालकावर अनैसर्गिक कृत्य करून त्याला पाण्याच्या टाकीत टाकल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील वातावरण अत्यंत तापलेले आहे. त्या नराधमाला त्वरित अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

हेही वाचा - विजेच्या धक्क्याने मुलासह वडिलांचाही मृत्यू, यवतमाळमधील घटना

या घटनेची तक्रार वर्धा पोलीस ठाण्यात  करण्यात आली आहे. तारफाईल येतील रहीम या दारू विकेत्याकडे आरोपी कामाला आहे. त्याच्यावर या पूर्वीही गुन्हे दाखल करण्यात आलेला असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी पोलिस ठाण्याला घेराव घातला. त्यामुळं काही काळ वातावरण तणावग्रस्त होत. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

First published: June 6, 2020, 7:38 AM IST

ताज्या बातम्या