माझ्याविरुद्ध तक्रार का केली? नवऱ्यासह तिघांनी हात-पाय बांधून केली महिलेला मारहाण

तळेगाव पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तळेगाव पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • Share this:
    नरेंद्र मते, वर्धा, 16 फेब्रुवारी : 'पोलिसात तक्रार का दिली, या कारणावरून वाद घालत विवाहितेचे हातपाय बांधून तिला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकरा समोर आला आहे. वर्धा जिल्हातील जसापुर इथं ही घटना घडली आहे. तळेगाव पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारकर्त्या विवाहितेने पती सुरेश पालिवाल याच्यासह नरेंद्र पालिवाल, नलिनी पालिवाल यांच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वी पोलिसात तक्रार दाखल केली होती. पती सुरेश याने सदर महिलेशी त्या कारणातून वाद करत तू आमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार का केली, जामिनासाठी एक लाख रुपये लागले असून ते सर्व पैसे परत कर असे म्हणून शिवीगाळ केली, असं दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. नरेंद्र आणि नलिनी पालिवाल यांनी विवाहितेचे हात पाय लोखंडी खांबाला बांधून तिला मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी तळेगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहे. तिघेही पोलिसात! दुसऱ्याशी जुळले अन् पहिल्याला फसवले, सहन नाही झाले कॉन्स्टेबलने विष घेतले! दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात महिला अत्याचाराचे प्रमाण सातत्याने वाढताना दिसत आहे. हे गुन्हे रोखण्याचे मोठं आव्हान गृहखातं आणि पोलीस प्रशासनासमोर आहे.
    First published: