कंटेनरवरचा ताबा सुटला, रिक्षावर आदळला; 6 ठार

कंटेनरवरचा ताबा सुटला, रिक्षावर आदळला; 6 ठार

  • Share this:

वर्धा, 01 आॅक्टोबर : कंटेनर आणि आॅटोमध्ये झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झालाय. भरधाव कंटेनर ऑटोवर आदळल्याने ऑटोतील 6 जण चिरडून ठार झाले आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 5 वर पोहना गावानजीक येरला इथं हा भीषण अपघात झाला. कंटेनरचा टायर फुटल्याने अनियंत्रित झालेल्या कंटेनरने प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, आॅटो रिक्षाचा चुराडा झाला.

या अपघातात ऑटोत स्वार 6 प्रवासी नितीन कंगाले, यमुना कंगाले, हरिभाऊ ठमके, श्रावण आलाम, वच्छला आलाम आणि ज्ञानेश्वर कुमरे यांचा जागीच मृत्यू झाला तर नानाजी पुरके, बंडू मडावी, जानराव इंगोले, आणि वच्छला मडावी हे चार जण गंभीर जखमी झाले.

जखमींना उपचारासाठी वडणेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

=========================================================

लष्कराची बुलेटवर चित्तथरारक प्रात्यक्षिकं, पाहून थक्क व्हाल : VIDEO

First published: October 1, 2018, 11:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading