वर्धा बनतोय कोरोनाचा नवा हॉटस्पॉट, जिल्हाबंदीची शक्यता

वर्धा बनतोय कोरोनाचा नवा हॉटस्पॉट, जिल्हाबंदीची शक्यता

मागील आठ दिवसांत 1 हजार 23 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात 36 तासांच्या संचारबंदीला लागू करण्यात आली आहे.

  • Share this:

वर्धा, 28 फेब्रुवारी : महाराष्ट्रापुढे (Maharashtra) कोरोनाचे (Corona) संकट पुन्हा एका उभे ठाकले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. यवतमाळ, अकोला पाठोपाठ वर्ध्यामध्येही (Wardha) कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या आठ दिवसांत तब्बल 1 हजार 23 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.

वर्ध्या जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालला आहे. मागील आठ दिवसांत 1 हजार 23 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात 36 तासांच्या संचारबंदीला रात्रीपासून सुरुवात झाली आहे.  जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात न आल्यास लॉकडाउन सोबतच जिल्हाबंदी करण्यात येण्याची शक्यता आहे.

शहरातील गिताईनगर, स्नेहल नगर, सिंदी(मेघे), लक्ष्मीनगर, मसाळा, रामनगर, सावंगी (मेघे) तसंच हिंगणघाटमध्ये गांधी वॉर्ड, संत तुकडोजी वॉर्ड, ज्ञानदा स्कूल, देवळीमध्ये  रामनगर, पुलगाव, गांधी चौक पूलगाव, नाचणगाव या ठिकाणी हॉटस्पॉट असून सदर ठिकाणी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.

अवघ्या 250 रुपयांत मिळणार खासगी रुग्णालयातही कोरोना लस!

दरम्यान, कोविड-19 (Covid-19) विरोधात लढण्यासाठी लशींच्या (Coronavirus Vaccine) किंमतींबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्यात पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे नागरिक लशीच्या प्रतीक्षेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, खासगी रुग्णालयांमध्ये एका डोससाठी 250 रुपये आकारले जाऊ शकतात. राज्याचे आरोग्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांसाठी लसीकरणाच्या मोहिमेबद्दल खासगी रुग्णालयांना सूचित करण्यात आलं आहे.

डॉक्टर व्यास यांनी सांगितलं की, खासगी रुग्णालयात एका व्यक्तीमागे 250 रुपये आकारले जाऊ शकतात. ते पुढे म्हणाले की, नॅशनल हेल्थ ऑथॉरिटीचे कार्यकारी अधिकारी आणि केंद्रीय आरोग्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली कोविड 2.0 बाबत झालेल्या प्रशिक्षण आणि वर्च्युअल मिटिंगमध्ये सर्विस चार्जसंदर्भात माहिती देण्यात आली होती. डॉ. व्यास पुढे म्हणाले की, कोविड सेंटर्स म्हणून काम करणाऱ्या खासगी रुग्णालयांकडून आकारण्यात येणारा सर्विज चार्ज प्रत्येक व्यक्ती व एका डोसमागे 100 रुपयांपर्यंत असेल. यासोबतच रुग्णालये लशींच्या किंमतींबरोबरच प्रति व्यक्ती डोस 150 रुपये वसूल करतील. अशातच खासगी रुग्णालयांना प्रत्येक व्यक्तीमागे डोस 250 रुपयांपर्यंत पडू शकेल.

Published by: sachin Salve
First published: February 28, 2021, 8:06 AM IST
Tags:

ताज्या बातम्या