मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Wardha : बोट उलटून 11 जण बुडाले, मृतक आणि बेपत्ता नागरिकांची नावे

Wardha : बोट उलटून 11 जण बुडाले, मृतक आणि बेपत्ता नागरिकांची नावे

Wardha Boat capsized: वर्धा जिल्ह्यात बोट उलटली, या दुर्घटनेत 11 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

वर्धा, 14 सप्टेंबर : वर्धा जिल्ह्यात (Wardha district) नदीमध्ये बोट उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 11 जणांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नदीत बुडालेल्या 11 जणांपैकी तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे तर इतर 8 जणांचा अद्यापही शोध सुरू आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृतकांमध्ये एका दोन वर्षीय चिमुकलीचाही समावेश (2 year old girl died) आहे. (Boat capsized in Wardha river)

दुर्घटनेतील मृतकांची नावे

नारायण मटरे, वय - 45

वंशिका शिवणकर, वय 2 वर्षे

किरण खंडाळे, वय 25 वर्षे

बेपत्ता असलेल्या नागरिकांची नावे

अश्विनी खंडाळे, वय - 25

कृष्णाली वाघामारे , वय - 19

अतुल वाघमारे, वय - 25

निशा मटरे, वय - 22

अदिती खंडाळे, वय - 13

मोहिनी खंडाळे, वय - 11

पियुष मटरे, वय - 8

पूनम शिवणकर, वय - 26

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास एका कुटुंबातील काही जण हे गाडेगाव येथे दशक्रिया विधीसाठी आले होते. तो आटपून परतत असताना वरूडच्या दिशेने जात असताना बोट अचानक उलटली. या दुर्घटनेत 11 जणांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

वर्धा जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने नद्या ओसंडून वाहत आहेत. नदीच्या एका किनाऱ्यावरुन दुसऱ्या किनाऱ्यावर जात असताना बोटीला अपघात झाला आहे. या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसल्याने ही दुर्घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

First published:

Tags: Wardha