Home /News /maharashtra /

Wardha: नाव दुर्घटनेपूर्वीचा VIDEO आला समोर, बुडालेल्या 11 जणांपैकी अद्यापही 8 जण बेपत्ता

Wardha: नाव दुर्घटनेपूर्वीचा VIDEO आला समोर, बुडालेल्या 11 जणांपैकी अद्यापही 8 जण बेपत्ता

वर्धा जिल्ह्यात नाव उलटून झालेल्या दुर्घटनेत 11 जण बुडाले. यापैकी तिघांचे मृतदेह हाती लागले आहेत.

वर्धा, 15 सप्टेंबर : वर्धा जिल्ह्यातील नदीच्या पात्रात मंगळवारी नाव उलटली (Wardha boat capsized). नाव उलटल्याने 11 जण बुडाले. या दुर्घटनेपूर्वीचा एक व्हिडीओ (Video before incident happened) आता समोर आला आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 11 जणांचा नदीपात्रात नाव बुडाल्याने मृत्यू झाला. आज दुसऱ्या दिवशी सकाळपासून परत बचाव आणि शोध शोध मोहिमेला प्रारंभ झाला आहे. मात्र, अद्यापही 8 जणांचे मृतदेह हाती लागलेले नाहीयेत. (8 people still missing) अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील गाडेगाव येथील मटरे कुटुंबातील सदस्य नजीकच्याच झुंज येथील वर्धा नदीच्या पात्रात अस्थी विसर्जनासाठी गेले होते. मात्र थोड्याच वेळात ही नाव उलटली. वयात 11 जण बुडून गेले. नाव ज्यावेळी अस्थी विसर्जनासाठी गेली त्यावेळचा व्हिडीओ हाती आला असून यात एक व्यक्ती बोटीच्या बाहेर निघून अस्थी विसर्जन करत असल्याचे दिसत आहे. नाव उलटून झालेल्या दुर्घटनेत एकूण 11 जण बुडाले असून तिघांचे मृतदेह हाती लागले आहेत तर अजूनही या त्यातील आठ जणांचा मृतदेहांचा शोध लागलेला नाहीये. घटनास्थळी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि जिल्हाधिकाऱ्यांचे पथक सकाळी सहा वाजल्यापासून या नदीपात्रात शोध घेत आहेत. जवळपास 35 किलोमीटरपर्यंत नदीपात्रात शोध घेतल्याचं एनडीआरएफचे प्रमुख बिपिन सिंग यांनी सांगितलं. मात्र अद्यापही मृतदेह हाती लागला नाहीये. अपघातातून बचावलेल्या व्यक्तींची नावे श्याम मनोहर मटरे, वय - 25 वर्ष राजकुमार रामदास उईके, वय - 45 वर्ष मृतकांची नावे नारायण मटरे, वय - 45 वर्ष रा. गाडेगाव किरण विजय खंडाळे, वय 28 वर्ष रा. लोणी वंशिका प्रदीप शिवनकर, वय 2 वर्ष रा. तिवसाघाट बेपत्ता असलेले नागरिक अतुल गणेश वाघमारे, वय - 25 वर्ष वृषाली अतुल वाघमारे, वय - 20 वर्ष आदिती सुखदेव खंडाळे, वय- 10 वर्ष मोना सुखदेव खंडाळे, वय - 12 वर्ष अश्विनी अमर खंडाळे, वय - 21 वर्ष निशा नारायण मटरे वय, वय - 22 वर्ष पियुष तुळशीदास मटरे, वय - 8 वर्ष पूनम प्रदीप शिवनकर, वय - 26 वर्ष
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Wardha

पुढील बातम्या