• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • बायको-सासुबरोबर जेलमध्ये जायचं का? प्रकाश आंबेडकरांची चव्हाणांना थेट धमकी

बायको-सासुबरोबर जेलमध्ये जायचं का? प्रकाश आंबेडकरांची चव्हाणांना थेट धमकी

'अशोकराव बोलले वंचितच्या गाडीत पेट्रोल भाजप भरते. अशोकराव, ही चूक आयुष्यात पुन्हा कधी करू नका. निवडणूक होऊ द्या'

  • Share this:
नांदेड, 25 ऑक्टोबर : नांदेडमधील (nanded) देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या (deglur bypoll election 2021) निमित्ताने राजकीय आखाडा चांगलाच तापला असून आरोप-प्रत्यारोपावरून थेट धमकीवर पोहोचला आहे. भाजप नेत्यांपाठोपाठ आता वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर ( prakash Ambedkar) यांनीही 'बायको सासुबरोबर जेलमध्ये जायचं का ते ठरवा' असं म्हणत काँग्रेसचे नेते आणि मंत्री अशोक चव्हाण ( ashok chavan) यांना धमकीच दिली आहे. देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीनिमित्त वंचित आघाडीच्या वतीने प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलत असताना प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यावर घणाघाती प्रहार केला. 'आदर्श प्रकरण पुन्हा काढायचे का? अशी धमकीच   प्रकाश आंबेडकर यांनी उघडपणे अशोक चव्हाणांना दिला. Cashew Milk : चांगल्या झोपेसाठी काजू दूध आहे खूप फायदेशीर, वाचा फायदे 'अशोकराव बोलले वंचितच्या गाडीत पेट्रोल भाजप भरते. अशोकराव, ही चूक आयुष्यात पुन्हा कधी करू नका. निवडणूक होऊ द्या, आमच्या गाडीमध्ये कुणी-कुणी पेट्रोल भरलं हे राहु द्या, आम्ही हायकोर्टात विचारतो आदर्श प्रकरणात कुणाकुणाचा फ्लॅट आहे. अशोक चव्हाण आपणाला बायको आणि सासुबरोबर जेलमध्ये जायचं का ते ठरवा? असा खडासवाल करत प्रकाश आंबेडकर यांनी अशोक चव्हाण यांना इशारा दिला. T20 World Cup : सचिन तेंडुलकर ते राहुल गांधी, मोहम्मद शमीसाठी दिग्गजांची बॅटिंग! तसंच, एक मोर्चा हायकोर्टावर गेला की, तुम्ही दडवलेली फाईल पुन्हा बाहेर येईल आणि सुशीलकुमार शिंदे यांनाही जेलमध्ये घेऊन जाईल, असा इशाराही बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला. किरीट सोमय्यांचा दौरा रद्द दरम्यान, दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते अशोक चव्हाण यांना किरीट सोमय्या मोठा खुलासा करणार अशी धमकी देत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तसे संकेतच दिले आहे. उद्या 26 तारखेला किरीट सोमया नांदेड दौऱ्यावर येणार होते.   सोमय्या हे अशोक चव्हाण यांच्याबद्दल आरोप करतील असं वातावरण तयार झालं होतं. परंतु, 26 रोजी सोमय्या नांदेडमध्ये प्रेस घेऊन देगलूरला सभा घेणार होते. पण आज रात्री अचानक त्यांचा दौरा रद्द झाल्याचं सांगण्यात आले आहे. कारण मात्र गुलदस्त्यात आहे. सोमय्या हे परवा 27 तारखेला येणार असल्याचं सांगण्यात आले आहे.
Published by:sachin Salve
First published: