मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पांडुरंग पांडुरंग, वाखरीत ग्रामपंचायतीने 23 बिअर शॉपींना दिली मंजुरी, मालकांकडून 1 लाख रुपये घेतला ग्रामनिधी!

पांडुरंग पांडुरंग, वाखरीत ग्रामपंचायतीने 23 बिअर शॉपींना दिली मंजुरी, मालकांकडून 1 लाख रुपये घेतला ग्रामनिधी!

ज्ञानेश्वर माऊली व तुकाराम महाराज पालखी तळ असलेल्या वाखरीमध्ये ही घटना घडली आहे.

ज्ञानेश्वर माऊली व तुकाराम महाराज पालखी तळ असलेल्या वाखरीमध्ये ही घटना घडली आहे.

ज्ञानेश्वर माऊली व तुकाराम महाराज पालखी तळ असलेल्या वाखरीमध्ये ही घटना घडली आहे.

पंढरपूर, 31 ऑक्टोबर : विठूरायाच्या पंढरपूरनगरीमध्ये (pandharpur) गावकऱ्यांनी अजब ठराव केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. ज्ञानेश्वर माऊली व तुकाराम महाराज पालखी तळ असलेल्या वाखरीच्या ग्रामसभेत (Wakhri Gram Panchayat) 23 बिअर शॉपींना (beer shops ) मंजुरी दिल्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा राज्यभरातील वारकरी आणि महिलांनी निषेध केला आहे.

ज्ञानेश्वर माऊली व तुकाराम महाराज पालखी तळ असलेल्या वाखरीमध्ये ही घटना घडली आहे. वाखरी येथील ग्रामसभेने तब्बल 23 नवीन बिअर शॉपींना ना हरकत परवाना देण्याचा ठराव मंजूर केला आहे.

शेवटच्या स्पर्धेतही कॅप्टनने तेच केलं, विराटच्या 10 घोडचुकांनी टीम इंडियाचा घात

एवढंच नाहीतर बिअर शॉपीधारकाकडून चक्क 1 लाख रुपये ग्रामनिधी घेऊन शॉपीला परवानगी देण्यात येईल असा धक्कादायक ठराव सुद्धा ग्रामपंचायतीने केला आहे.

ग्रामपंचायतीच्या या भूमिकेचा राज्यभरातील वारकरी व महिलांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.  बिअर शॉपी ना परवानगी देण्याचा ठराव रद्द करावा अन्यथा ग्रामपंचायतीच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही या गावातील महिलांनी व वारकऱ्यांनी दिला आहे.

न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात Mohammed Shami ला रावळपिंडी एक्सप्रेसचा कानमंत्र

वाखरी ग्रामसभेनं एकाच दिवशी २३ बिअर शॉपींना परवानगी दिली. एकाबाजूने पाहिलं तर आषाढी वारीच्या निमित्ताने वाखरीमध्ये लाखो वारकरी हे शेवटचा मुक्काम करत असतात. वाखरीमध्ये शेवटचे रिंगण सुद्धा भरवले जाते. अशा पवित्र भूमीमध्ये असा निर्णय घेण्यात आला हा धक्कादायक आहे. आम्ही याआधीही वारीच्या मार्गात असलेल्या दारूच्या दुकानांना विरोध केला आहे. वाखरी ग्रामसभेनं हा निर्णय घेतला आहे, आम्ही अजिबात गप्प बसणार नाही, असं मंदिर समिती सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी स्पष्ट केलं आहे.

First published: