राज्य सरकारचा मोठा दिलासा, या वाहनांना टॅक्समध्ये मिळणार 50 टक्के सूट

राज्य सरकारचा मोठा दिलासा, या वाहनांना टॅक्समध्ये मिळणार 50 टक्के सूट

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे व्यावसायिक वाहन मालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

  • Share this:

मुंबई, 15 सप्टेंबर: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे व्यावसायिक वाहन मालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा दिला आहे. वाहनांच्या वार्षिक करावर (Tax)50 टक्के सूट मिळण्यासंबंधी राज्य सरकारनं मंगळवारी अधिसूचना जारी केली आहे.

हेही वाचा...मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांनी संभाजीराजेंना सांगितला नवा फार्म्युला

1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 पर्यंत वाहनांच्या वार्षिक करावर 50 टक्के सूट मिळणार आहे. या संदर्भात राज्य सरकारनं अधिसूचना जारी केली आहे. खासगी सेवा आणि व्यावसायिक वाहनांवर ही सूट मिळणार आहे. यामध्ये मालवाहतूक, पर्यटक, खनिजे, खासगी सेवा आणि शालेय विध्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा समावेश आहे. मात्र 31 मार्च, 2020 पूर्वी कर भरणाऱ्यांनाच हा लाभ मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता हा निर्णय..

राज्यात लॉकडाऊन सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक करणारे वार्षिक कर भरणाऱ्या वाहनांना 1 एप्रिल 2020 ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीत वाहन करमाफी देण्याबाबतचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता.

केंद्र शासनानं देशात 25 मार्च 2020 पासून लॉकडाऊन घोषित केली होती. नंतर राज्य शासनाने 31 मे 2020 च्या आदेशान्वये मिशन बिगिन अगेन अंतर्गत काही प्रमाणात लॉकडाऊनचे नियम शिथिल केले. मात्र, त्यानंतरही बरेज दिवस सार्वजनिक वाहतूक बंदच होती. त्यामुळे विविध वाहतूक संघटनांनी नुकसान भरपाई म्हणून शासनाने करमाफी द्यावी, अशी विनंती केली होती.

हेही वाचा...ऊसतोड मजूर लवाद कालबाह्य! विनायक मेटेंनी साधला पंकजा मुंडेंवर निशाणा

राज्यामध्ये वार्षिक करप्रणालीच्या वाहनांचा 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2020 या सहा महिन्यांच्या कालावधीत कर भरण्यापासून 100 टक्के करमाफी देण्याचा म्हणजे 2020-2021 या आर्थिक वर्षासाठी एकूण वार्षिक कराच्या 50 टक्के करमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. सदर करमाफी ही मालवाहतूक करणारी वाहने, पर्यटक वाहने, खोदकाम करणारी वाहने, खासगी सेवा देणारी वाहने, व्यावसायिक कॅम्पर्स वाहने, स्कूल बसेस या वार्षिक कर भरणाऱ्या वाहनांना लागू राहणार आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: September 15, 2020, 7:36 PM IST

ताज्या बातम्या