औसा, 11 मार्च : औसा शहरापासून काही अंतरावर असलेल्या चंद्रलोक ढाब्यावर एक धक्कादायक घटना घडली आहे. या तालुक्यातील हसलगण येथील 48 वर्षीय भूजंग बाळाप्पा सोनवते यांचा खून करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
भूजंग बाळाप्पा सोनवते आणि सूरज अंबादास जगताप हे दोघेही औसा शहरापासून काही अंतरावर असलेल्या चंद्रलोक ढाब्यावर वेटरचं काम करतात. मात्र काल त्यांच्यामध्ये झालेल्या वादामुळे एकाला आपला जीव गमवावा लागला आहे.
औसा शहरात क्षूल्लक कारणावरुन हॉटेलच्या वेटरने सहकाऱ्याचा खून केल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. pic.twitter.com/lsoT1N1n72
48 वर्षीय भूजंग बाळाप्पा सोनवते एक वेटर असून ते चंद्रलोक ढाब्यावर काम करतात. काल रात्री ते झोपले असताना 17 वर्षीय सूरज अंबादास जगताप याने ते झोपेत असताना त्यांच्या डोक्यात लोखंडी पट्टीने वार केले. यातच सोनवते यांचा मृत्यू झाला. सूरजही चंद्रलोक ढाब्यात वेटरचे काम करतो. काल दुपारी या दोघांमध्ये काही शुल्लक कारणाने भांडण झालं होतं. याचा राग सूरजच्या डोक्यात होता. काल रात्री ढाबा बंद करुन झोपले असताना सूरजने सोनवते यांच्या डोक्यात लोखंडी पट्टीने वार केला. सूरजने त्यांना केलेल्या मारहाणीत त्यांचा जागीच मृत्यू झाला. सोनवते यांच्या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. एका छोट्याशा कारणाने सूरजने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे
हे वाचा - मुंबई विमानतळावर महिलेच्या गुप्तांगात कोकेनच्या पिशव्या, एक्स-रेमधून झाला खुलासा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.