धक्कादायक! लोकांच्या अकाऊंटमधून परस्पर काढले लाखो रुपये, ग्राहक सेवा केंद्राचा संचालक फरार

धक्कादायक! लोकांच्या अकाऊंटमधून परस्पर काढले लाखो रुपये, ग्राहक सेवा केंद्राचा संचालक फरार

अनेक ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणूक (Financial Fraud) केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

  • Share this:

 

वाशिम, 10 मार्च : वाशिम जिल्ह्याच्या (Washim District) मालेगाव तालुक्यातील राजुरा येथील ग्राहक सेवा केंद्र संचालक मच्छिंद्र मोहळे याने राजुरासह परिसरातील अनेक ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणूक (Financial Fraud) केल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यानंतर आरोपी मच्छिंद्र मोहळे हा फरार झाला आहे.

ग्राहकांनी मालेगावच्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे चौकशी केली असता 6 ग्राहकांची जवळपास 15 लाखांची फसवणूक झाल्याचं उघड झालं आहे. फसवणूक झालेल्या ग्राहकांनी न्याय मिळावा यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत ठोस कारवाईची मागणी केली आहे. विशेष म्हणजे या ग्राहक सेवा केंद्र संचालकाने 300 ग्राहकांचे थम्बद्वारे परस्पर लाखो रुपये काढल्याचं बोललं जात असून हा आकडा एक ते दीड कोटीपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. इतरही बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रांकडूनही असे प्रकार घडले का याचाही शोध घेण्याची आवश्यकता आहे.

वाशिम जिल्ह्यातील राजुरा येथील सेंट्रल बँकेचा ग्राहक सेवा केंद्र चालक मच्छिंद्र मोहळे याच्या ग्राहक सेवा केंद्राद्वारे गावातील अनेक गरजवंत ग्राहक आपल्या खात्यात पैसे टाकायचे आणि काढायचे. जर खात्यातून पैसे काढावयाचे असल्यास बायोमेट्रिक मशीन वर हाताचे कोणतेही बोट ठेऊन नंतर पैसे काढले जात असत. यामुळं या सेंट्रल बँकेच्या ग्राहक सेवा केंद्र चालकाने अनेक ग्राहकांच्या खात्यातील पैसे त्यांच्या विविध बोटाचे ठसे घेऊन काढले आहेत.

हेही वाचा - चोरी केल्याच्या संशयावरून अकोला शहरात मध्यरात्री दगडाने ठेचून एकाची हत्या

जो ग्राहक पैसे काढावयास जायचा त्याच्या हाताच्या एखाद्या बोटाचा ठसा बायोमेट्रिक थम्ब मशीनवर घेऊन बोटाचा ठसा व्यवस्थित न आल्याने पुन्हा तो इतर बोटाचे ठसे घेऊन ग्राहकाच्या खात्यातून परस्पर लाखो रुपये काढायचा. सदर प्रकार राजुरा येथील विष्णू रवणे आणि भागर्थी इंगळे यांच्यासह इतर काही ग्राहक जेव्हा मालेगांव शहरातील सेंट्रल बँकेत पैसे काढण्यास गेले असता उघडकीस आला.

अशाच प्रकारे इतरही अनेक ग्राहकांचे लाखो रुपये या मच्छिन्द्र मोहळे याने काढल्याचं समजते.

अनेक ग्राहकांचे पैसे या ग्राहक सेवा केंद्र चालकाने परस्पर काढल्याने अनेक ग्राहकांनी सेंट्रल बँकेच्या मालेगांव शाखा व्यवस्थापकाकडे तक्रार केल्यानं मच्छिन्द्र मोहळे याचे खाते बँकेचे अधिकारी आणि पोलीस सखोल तपास करत असल्याचं शाखा व्यवस्थापक संदीप जमदाडे यांनी सांगितलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: March 9, 2021, 7:32 AM IST

ताज्या बातम्या