बीड जिल्ह्यात पंचायत समितीसाठी मतदान शांततेत सुरू

बीड जिल्ह्यात पंचायत समितीसाठी मतदान शांततेत सुरू

६५३ ग्रामपंचायतींसाठी आज सकाळी 7.30 ला मतदान सुरू झालं आहे. जिल्ह्यात डिसेंबर अखेर मुदत संपणार या ६९० ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे.

  • Share this:

बीड, 07 ऑक्टोबर: सरपंचपदासाठी ६४२ तर सदस्यपदाकरता ६५३ ग्रामपंचायतींसाठी आज सकाळी 7.30 ला मतदान सुरू झालं आहे. जिल्ह्यात डिसेंबर अखेर मुदत संपणार या ६९० ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे.

६९० सरपंच आणि सदस्यपदाच्या ५ हजार ८४४ जागा आहेत. सदस्यपदासाठीच्या एकूण जागांपैकी २७ जागा या रिक्तच राहिल्या आहेत. या जागांसाठी अर्जच आले नाहीत तर जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींनी सामंजस्य व सलोख्याचा पायंडा पाडत गावकारभाऱ्याची निवड बिनविरोध केली आहे. यासोबतच ७६९ सदस्य देखील ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडून गेले आहेत. उर्वरित 642 ग्रामपंचायतीसाठी सकाळी साडे सात वाजता मतदानास सुरूवात झाली.

आज जिल्ह्यात सर्वत्र सकाळी मतदानास शांततेत सुरूवात झाली , मतदानास सध्या तरी फारसा उत्साह दिसत नाही. आज स्थानिक सुट्टी जाहीर केल्यान शक्यतो मतदार जरा निवांतच मतदानास बाहेर पडतील असा अंदाज देखील व्यक्त केला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 7, 2017 10:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading