लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद, मतदानाची टक्केवारी घसरली

लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद, मतदानाची टक्केवारी घसरली

पालघरमध्ये मतदानाची टक्केवारी घसरली आहे. 2014 च्या निवडणुकीत 62.90 टक्के मतदान झालं होतं.

  • Share this:

पालघर, 28 मे : पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी ईव्हीएम बिघाडाच्या वादात मतदान संपुष्टात आलं. पालघरमध्ये 46.50 टक्के मतदान झालंय. तर भंडाऱ्यात  38.65 टक्के मतदान झालंय.

पालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. मात्र, या मतदानाला ईव्हीएम बिघाडाचं गालबोट लागलंय.

ईव्हीएमच्या मुद्द्दयावरून वारंवार सरकारवर आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या विरोधकांसाठी ईव्हीएम घोळानं आयतं कोलीत मिळालं. राज्यातील पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत पहिल्यांदाच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर केला जातोय. यावेळी इव्हीएम मशीनचा अभूतपूर्व गोंधळ समोर आला. अनेक ठिकाणी मशीन बंद पडल्या. त्यामुळे शिवसेनेनं रितसर तक्रार नोंदवत भाजपवर हल्ला चढवलाय.

भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणूकीत एकूण २१४९ मतदार केंद्रापैंकी १०० केंद्रांमधून एव्हीएम बंद पडल्याच्या तक्रारी आल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी मतदान उशीरानं सुरू झालं. पण नंतर सगळं सुरळीत झाल्याची सारवासारव करत बंद पडलेल्या मशीनचं खापर जिल्हाधिकाऱ्यांनी तापलेल्या सूर्यनारायणावर फोडलं. अखेर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार परडली.

मतदानाची टक्केवारी घसरली

दरम्यान, पालघरमध्ये मतदानाची टक्केवारी घसरली आहे. 2014 च्या निवडणुकीत 62.90 टक्के मतदान झालं होतं. मात्र, यावेळी 46.5 टक्के मतदान झालंय. भंडारा- गोंदियातही टक्केरवारी घसरली आहे. 2014 मध्ये 72.30 टक्के विक्रमी मतदान झालं होतं. यावेळी 38.65 टक्केच मतदान झालंय.

पालघर

2014                2018(पोटनिवडणूक)

62.90 %            46.5 %

भंडारा-गोंदिया

2014                2018(पोटनिवडणूक)

72.30 %            38.65%

 

First published: May 28, 2018, 9:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading