मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

तळीये गावातील दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून मिळणार घरं, नारायण राणेंची घोषणा

तळीये गावातील दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून मिळणार घरं, नारायण राणेंची घोषणा

Narayan Rane Visit Kokan:  पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी कोकण (Kokan Flood) मधली पूरग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 25 जुलै: राज्यात गेल्या चार दिवसात पावसानं धुमाकूळ घातला. या अतिवृष्टीमुळे कोकणातील (Kokan) अनेक भागात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. चिपळूण (Chiplun) महाड, खेड (Khed) तालुक्यात महापूर आला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. याच पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी कोकण (Kokan Flood) मधली पूरग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

रायगड जिल्ह्यातील महाड येथील तळीये गावातील घरांवर कोसळलेल्या दुर्घटनेत 44 जणांचा मृत्यू झाला. या ठिकाणी जाऊनही त्यांनी पाहणी केली. या पाहणीनंतर नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

ही दुर्दैवी बाब आहे. केवळ एकच गोष्ट आम्ही परत आणू शकत नाही. ते म्हणजे मृत्यू झालेल्यांना परत आणता येणार नाही. मात्र जे आहेत त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे दिलासा देता येईल असा मला विश्वास वाटतो, असं नारायण राणे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळून तेथील कुटुंबे मातीखाली गाडली गेली. येथील सुमारे 42 कुटुंब उद्ध्वस्त झाली असून त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देण्यात येणार असल्याची घोषणा नारायण राणे यांनी केली आहे. या घटना घडल्यानंतर दुर्घटनाग्रस्तांना केंद्र आणि राज्य सरकारकडून मदत दिली जात आहे. त्या पलीकडे मदत होणार नाही असं नाहीये. दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गंत पक्की घरं देण्याची योजना असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

Breaking News: बचावकार्य बोटच अडकली पुराच्या पाण्यात, Live Video

ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. नैसर्गिक आपत्ती अकस्मात घडल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात, अनेकांचा मृत्यू झालेला आहे. आज आम्ही या दुर्दैवी घटनेची पाहणी करायला आलोय आणि माझ्या माहितीप्रमाणे प्रवीण दरेकर हे या ठिकाणी दुसऱ्यांदा आलेले आहेत. स्थानिकांना मदत मिळावी यासाठी अधिकारी, एनडीआरएफची पथकं चांगले काम करत आहेत. गावातील सरपंचांसोबत माझं बोलणं झालं आहे. आमचं गावातच कायमच पुनर्वसन करावं, अशी त्यांची मागणी असल्याचंही नारायण राणे यांनी सांगितलं.

First published:

Tags: Devendra Fadnavis, Narayan rane, Pravin darekar