मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

विश्वास नांगरे पाटील म्हणतात, 'मीच सोशल मीडियाचा पीडित'

विश्वास नांगरे पाटील म्हणतात, 'मीच सोशल मीडियाचा पीडित'

माझं फेसबुकवर एकही अकाउंट नाही, माझ्या नावाने फिरणाऱ्या पोस्ट्स माझ्या नाहीत, असं आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटलं आहे. मी स्वत:च सोशल मीडियाचा पीडित आहे, असंही ते म्हणाले.

प्रशांत बाग नाशिक, 24 जून : आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचा राज्यभरातल्या तरुणांवर चांगलाच प्रभाव आहे. अनेक ठिकाणी त्यांची व्याख्यानं आयोजित केली जातात, त्यांचे विचार ऐकण्यासाठी सगळेच जण उत्सुक असतात. त्यामुळेच फेसबुकवर त्यांच्या नावाने असलेल्या अकाउंटलाही जोरदार प्रतिसाद मिळत असतो. विश्वास नांगरे पाटील हे तरुणांचे 'आयडॉल' असल्यामुळे त्यांच्या फेसबुक पोस्टला मिळणारे लाखो लाइक्स, कमेंट्स पाहिल्या तर आपल्याला आश्चर्य वाटत नाही. त्यांच्या या पोस्टमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करावा यापासून ते प्रेरणादायी विचार, कविता, वेगवेगळी छायाचित्रं असा सगळ्या प्रकारच्या पोस्ट्सचा समावेश असतो. 'माझं फेसबुक अकाउंट नाही' असं असलं तरी खुद्द विश्वास नांगरे पाटील यांनी मात्र एका पत्रकार परिषदेत दिलेल्या स्पष्टीकरणामुळे नवीच माहिती समोर आली आहे. माझ्या नावाने सोशल मीडियावर फिरणाऱ्या पोस्ट्स माझ्या नाही. या पोस्टवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन विश्वास नांगरे पाटील यांनी केलं आहे. एवढंच नव्हे तर माझं फेसबुक अकाउंटच नाही, असंही विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितलं. विश्वास नांगरे पाटील हे सध्या नाशिकचे शहर पोलीस आयुक्त आहेत. फेसबुकवरच्या बनावट अकाउंट्सच्या विरोधात त्यांनी सायबर सेलकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांच्या नावाची 19 फेसबुक पेजेस डिलीट करण्यात आली, असंही त्यांनी सांगितलं. बनावट अकाउंट्स बनावट फेसबुक अकाउंट्समुळे मीच सोशल मीडियाचा पीडित आहे, असं नांगरे पाटील म्हणाले. सोशल मीडियावरची बनावट अकाउंट्स आणि त्यामुळे पसरणारी खोटी माहिती, फेक न्यूज हा सगळ्यांच्याच चिंतेचा विषय बनला आहे. पण खुद्द विश्वास नांगरे पाटील यांच्यासारख्या पोलीस अधिकाऱ्यांनाच हा प्रश्न भेडसावतो आहे यावरून हा प्रश्न किती गंभीर आहे हे लक्षात येतं. ======================================================================================= VIDEO : मंत्रिमंडळात खडसेंना संधी का नाही? अजित पवारांची तुफान फटकेबाजी
First published:

Tags: Cyber crime, Facebook, Vishwas nangre patil

पुढील बातम्या