विश्वास नांगरे-पाटलांच्या 'कर्मभूमी'त चोरटे येताच मिळणार असा 'सिग्नल'

विश्वास नांगरे-पाटलांच्या 'कर्मभूमी'त चोरटे येताच मिळणार असा 'सिग्नल'

अलीकडे नाशिक शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. चोरी, खूनाच्या घटना दररोज घडताना दिसत आहे.

  • Share this:

नाशिक,8 डिसेंबर:अलीकडे नाशिक शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. चोरी, खूनाच्या घटना दररोज घडताना दिसत आहे. शहरात अशी स्थिती निर्माण झाली असताना गुन्हेगारांना प्रतिबंध करणे आता शक्य होणार आहे. नाशिकच्या सराफ बाजारात 36 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे कॅमेरे थेट पोलिस कंट्रोल रूमशी लिंक केले जाणार आहेत. पोलिसांकडे असलेल्या संशयितांचा डेटा कॅमेऱ्याच्या सिस्टिमला जोडाला जाणार आहे. चोरटे सीसीटीव्हीच्या नजरेत येताच 'पॉप-अप' मेसेजचा सिग्नल मिळेल. चोरट्यांनी जेरबंद करण्यात पोलिसांना मदत होणार आहे.

विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

नाशिक सराफ असोसिएशनतर्फे रविवार कारंजा ते दहिपूल परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते शनिवारी या कॅमेऱ्यांचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी पोलिस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक आयुक्त प्रदीप जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत सोमवंशी, असोसिएशनचे अध्यक्ष चेतन राजापुरकर, उपाध्यक्ष मेहूल थोरात, सचिव गिरीश नेवसे, राजेंद्र दिंडोरीकर, लाड सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष सुनील महालकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पोलिस आयुक्त म्हणाले की, सराफ बाजाराने घेतलेला निर्णय अभिमानास्पद असून, सुरक्षितता, जबाबदारी आणि पारदर्शकता राखली जाणार आहे. गुन्हे घडण्यास प्रतिबंध होणार असून, गुन्हेगार कोणत्याही परिस्थितीत आता सुटू शकणार नाही. अशीच यंत्रणा विविध ठिकाणी कार्यान्वित झाल्यास गुन्ह्यांच्या तपासाला वेग येईल, असे ते म्हणाले. त्यावेळी सराफ व्यावसायिकांनी काही समस्या मांडत त्यावर तोडगा काढण्याची विनंती आयुक्तांकडे केली.

दरम्यान, नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक राहिला नाही, अशी टीका होत आहे. एवढेच नाही तर राजकीय नेते गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घालत असून कुठेतरी आधी थांबवले पाहिजे. तेव्हा आणि तेव्हाच गुन्हेगारी कमी होईल, असेही बोलले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 8, 2019 09:42 PM IST

ताज्या बातम्या