दाभोलकर हत्या प्रकरण: वीरेंद्र तावडेच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

दाभोलकर हत्या प्रकरण: वीरेंद्र तावडेच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

20 ऑगस्ट 2013ला दाभोलकरांची पुण्यात हत्या करण्यात आली होती.त्यांची हत्या गोळ्या घालून करण्यात आली होती

  • Share this:

पुणे,28सप्टेंबर: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी आज एक महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या खटल्यात प्रमुख आरोपी असलेल्या वीरेंद्र तावडे याच्या जामीन अर्जावर आज पुणे कोर्टात सुनावणी होणार आहे

20 ऑगस्ट 2013ला दाभोलकरांची पुण्यात हत्या करण्यात आली होती.त्यांची हत्या गोळ्या घालून करण्यात आली होती. त्यानंतर बराच काळ याप्रकरणी आरोपी पकडले गेले नव्हते. नंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. सीबीआय तपासात अजूनही ठोस काहीच निष्पन्न झालेले नाही. यामुळे याप्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडेकडून न्यायालयाकडे जामिनाचा अर्ज करण्यात आला आहे. आता या अर्जावर काय सुनावणी होते याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलं आहे

डॉ. नरेंद्र दाभोलकर हे अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीचे प्रणेते होते. त्यांच्या हत्येविरूद्ध राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

First published: September 28, 2017, 10:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading