मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /बापरे! इंटरनेटवर हत्येचे VIDEO पहायचा आणि मग केली पत्नीचीच हत्या, विरारमधील घटनेने खळबळ

बापरे! इंटरनेटवर हत्येचे VIDEO पहायचा आणि मग केली पत्नीचीच हत्या, विरारमधील घटनेने खळबळ

Representative Image

Representative Image

Virar man murdered wife: मृतकाच्या भावाने सांगितले की, अजय इंटरनेटवर एखाद्या व्यक्तीला मारण्याची पद्धत शोधत असे.

विरार, 27 मे: विरार पोलिसांनी (Virar Police) एका व्यक्तीला आपल्या पत्नीच्या हत्येच्या आरोपात अटक केली आहे. आरोप आहे की हा व्यक्ती इंटरनेटवर हत्या करण्याची पद्धत शोधत असे (accused searching methods of murder on internet) आणि त्यानंतर त्याने आपल्याच पत्नीची हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, आरोपीच्या विरोधात आयपीसी 302 अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

मिडे डे च्या रिपोर्टनुसार, विरार पूर्वेकडील गोपचरपाडा परिसरात राहणारा 35 वर्षीय अजय हरभजन सिंह याने आपला गुन्हा कबूल केला आहे. चौकशीत असे समोर आले आहे की, मृतक रूबी हिचा यापूर्वी सुद्धा विवाह झाला होता. पहिल्या पतीपासून तिला तीन मुलं आहेत. त्यानंतर तिने अजय सोबत दुसरं लग्न केलं आणि त्यांना एक मुलगा सुद्धा आहे. तसेच आरोपी अजय याचंही यापूर्वी लग्न झालं होतं आणि रूबी सोबत त्याने दुसरं लग्न केलं.

रूबीची मोठी बहिण आपल्या परिवारासोबत इमारतीच्या ग्राऊंड फ्लोअरवर राहतात. याच इमारतीत रूबी आपला पती अजयसोबत राहत होती. रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, अजय यापूर्वी रूबीच्या भाचीसोबत पळून गेला होता. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, सुटका झाल्यावर अजय पुन्हा आपल्या पत्नीसोबत राहू लागला मात्र, तो वारंवार पत्नीला मारहाण करत असे.

पत्नीचा 15 दिवसांपासून सेक्स करण्यास नकार; पतीने रात्री घेतला धक्कादायक निर्णय

मंगळवारी रात्री रूबीची लहान बहिण त्यांच्या घरी पोहोचली तेव्हा रूबी बेशुद्धावस्थेत आढळून आली. रूबीच्या नाक आणि तोंडातून रक्त येत होतं. हे पाहून तिने तात्काळ याची माहिती आपल्या भावाला दिली. रूबीचा भाऊही लगेचच घरी पोहोचला. त्यांनी पाहिलं की, अजय दुसऱ्या खोलीत एका खुर्चीवर बसलेला होता. यासंदर्भात अजयला विचारले असता त्याने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे त्याने रूबीची हत्या केली असावी असा संशय त्यांना आला.

रूबीच्या भावाने पोलिसांना सांगितले की, अजय इंटरनेटवर एखाद्याची हत्या कशी करावी याचे मार्ग शोधत असे. पोलिसांनी सांगितले की, चौकशी दरम्यान अजयने आपला गुन्हा कबूल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

First published:
top videos

    Tags: Crime, Murder, Virar