वसई, 23 नोव्हेंबर : झटपट कमाईचे स्वप्न पाहून क्रिप्टो करन्सीच्या (cryptocurrency) नांदाला लागून विरारमधील एका व्यापाराला मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागलं. गंमत म्हणजे, आपण बिटकॉईनमध्ये (bitcoin) हरलेल्या 10 लाख रुपयांबाबत बायकोला कसे सांगायचे ? या विचारात या व्यापाऱ्याने चक्क लुटीचा बनाव रचला होता. मात्र, पोलिसांच्या तपासात ही चोरी नसून चोरीचा बनाव असल्याचे उघडकीस आणून व्यापाऱ्याच्या बनावाचा भांडाफोड झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभंत लिंगायत (shubham lingyat) असं या व्यापाऱ्याचं नाव आहे. विरारमध्ये (virar) राहणाऱ्या या व्यापाऱ्याने आपल्या मुलीच्या लग्नासाठी (daughters wedding) जमविलेले 10 लाख रुपये बिटकॉईनमध्ये हरला होता. मात्र याबाबत घरी सांगता येणार नसल्याने त्याने त्या पैशांची लूट झाल्याचा बनाव रचला.
सोमवारी 1 वाजताच्या सुमारास वसई पश्चिमेच्या पापडी परिसरात असलेल्या साई सर्व्हिसमध्ये तो गाडी खरेदीसाठी टोकनं देण्याच्या बहाण्याने गेला. रिक्षातून उतरताना त्याची 10 लाख रुपयांची बॅग एकाने लुटून नेली असा त्याने प्लॅन आखला व तशी वसई पोलीस ठाण्यात तक्रार केली.
Plant based diet: मायग्रेनपासून होईल सुटका, आहारात या गोष्टींचा करा समावेश
वसई पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व सीसीटीव्ही फुटेज तपासून तपास सुरू केला. मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी व्यापाऱ्याची कसून चौकशी केली असता पोलिसांनाही चक्रावून जाण्याची वेळ आली.
मुलीच्या लग्नासाठी जमविलेले पैसे बिटकॉईनमध्ये हरल्याने त्याने हा चोरीचा बनाव आखल्याचे पोलीस तपासात उघड झाले. हा व्यापारी किराणा दुकानांना माल विक्रीचा व्यवसाय करत असून बायकोच्या कटकटीपासून वाचण्यासाठी त्याने हा बनाव केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिल्याची माहिती वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Virar