नदीला आला होता पूर, तरीही पठ्ठ्याने ट्रॅक्टर नेला पुढे, पाहा हा VIDEO

नदीला आला होता पूर, तरीही पठ्ठ्याने ट्रॅक्टर नेला पुढे, पाहा हा VIDEO

ट्रॅक्टरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल झाला आहे.

  • Share this:

सटाणा, 05 जुलै : महाराष्ट्रात सर्वदूर पावसाने हजेरी लावली  आहे. नदी-नाले ओसांडून वाहत आहे. नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जीव धोक्यात घालून नदी ओलांडू नका, अशी सूचना वारंवार केली जात आहे. पण, सटाण्यात एका ट्रॅक्टरचालकाने नको ते धाडस करून सर्वांचा श्वास रोखला होता.

नाशिकच्या सटाणा भागातील या भागात रात्री आणि सकाळी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदी-नाले,ओढे ओसंडून वाहत आहे. काही रस्ते तर पाण्याखाली गेले आहे. श्रीपुरवडे-टिंगरी हा रस्ता पाण्याखाली गेलेला असतांना देखील एक चालकाने पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर घातला.

या चालकाने सुरुवातील ट्रॅक्टर पुरात घातला. त्यानंतर काही वेळ त्याने वाट पाहिली. तोपर्यंत या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला एक तरुण लटकला होता. तर दोघे जण ट्रॉलीमध्ये चढले होते. नदी शेजारी उभ्या असलेल्या लोकांनी त्याला नदी ओलांडू नको, असा सल्ला दिला. पण, पठ्ठ्याने तसाच ट्रॅक्टर नदीत घातला.  नदीच्या मध्यभागी गेल्यानंतर अर्धा ट्रॅक्टर हा पाण्याखाली गेला होता.

पण, सुदैवाने ट्रॅक्टर वाहून गेला नाही. त्यामुळे चालकासोबत इतरांचा जीव वाचला. ट्रॅक्टरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल झाला आहे.

तरुणांनी वाचवले पुरात वाहून जाणाऱ्या महिलांचे प्राण

दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मौजे कुरळी येथे संध्याकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे गावालगत असलेल्या नाल्याला पूर आला होता. संध्याकाळच्या वेळेस शेतातून परतणार्‍या 8 ते 10 मजूर महिला लाकडापासून बनवलेल्या नावेमध्ये बसून (रूख ) तिच्यावर बसून नाला ओलांडण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, संतुलन बिघडल्यामुळे रुख उलटली.

एकतर्फी प्रेमातून नववधूची दिवसाढवळ्या हत्या, ब्यूटी पार्लरमध्ये घुसून चिरला गळा

त्यात या महिला पुराच्या पाण्यामध्ये  पडल्या. त्याचा दरम्यान पलीकडच्या बाजूने संबंधित गावच्या कोतवालाचा मुलगा आणि त्याचे मित्र पूर पाहण्यासाठी गेले होते. ही घटना त्यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वतः  नाल्याच्या प्रवाहामध्ये उड्या मारल्या व त्या वाहून जाणार्‍या महिलांना त्यांनी सुरक्षितपणे काठावर आणले.

संपादन - सचिन साळवे

First published: July 5, 2020, 3:33 PM IST
Tags:

ताज्या बातम्या