कुणी तरी येणार गं..! चक्क पाळीव कुत्रीचे भरवले डोहाळे जेवण, पाहा हा VIDEO

कुणी तरी येणार गं..! चक्क पाळीव कुत्रीचे भरवले डोहाळे जेवण, पाहा हा VIDEO

अहमदनगरमध्ये एका कुटुंबाने आपल्या लाडाच्या श्वासाने मोठ्या थाटामाटात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम घेतला आहे.

  • Share this:

अहमदनगर, 15 डिसेंबर : 'कुणी तरी येणार येणार गं' म्हणत डोहाळे जेवण भरवले जात असते. पण जर हेच डोहाळे जेवण एखाद्या श्वासनाचे असेल तर..! दचकू नका, अहमदनगरमध्ये एका कुटुंबाने आपल्या लाडाच्या श्वासाने मोठ्या थाटामाटात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम घेतला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील  सावेडी उपनगरातील रहिवासी भगवान आणि प्रभावती कुलकर्णी  कुटुंबीयांनी आपल्या लाडक्या लुसी नावाच्या श्वासाने डोहाळे जेवणाचा कार्यक्रम घेतला होता. त्यामुळे लुसीच्या डोहाळे जेवणाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

विशेष म्हणजे, डोहाळ जेवण कार्यक्रमासाठी झोका, धनुष्यबाण, फुलांची सजावट आणि पारंपारिक गाणी लावण्यात आली होती. एवढंच नव्हे तर, गर्भवती महिलेला डोहाळ जेवणाला ज्याप्रमाणे हिरवी साडी-चोळी घेतली जाते, त्याचप्रमाणे ल्युसीलाही खास शिवलेला हिरवा ड्रेस घालून हेअरस्टाईल करून नटवण्यात आले होते.

तर परिसरातील महिलांनीही या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती. यावेळी महिलांनी लुसीचे औक्षण करून ओटीही भरली. सध्या या डोहाळजेवणाची नगरमध्ये चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

गाणं ऐकल्यानंतर गाय देते भरपूर दूध आणि भरघोस पिकानं हिरवंगार होतं शेत

दरम्यान, भोपाळमध्ये एका तरुण शेतकऱ्याने शेती आणि पशूपालनाची एक अनोखी पद्धत शोधून काढली आहे. हा शेतकरी गाणं म्हणतो आणि त्यामुळे गायीही भरपूर देतात असा प्रकार समोर आला आहे.

कपूरिया गावात राहणारा आकाश चौरसिया. आपल्या शेताला आणि गायींना म्युझिक ऐकवतो. कारण काय तर शेतात भरपूर पिक येऊन ते हिरवंगार व्हावं आणि गायींनीदेखील भरपूर दूध द्यावं. शेत आणि प्राण्यांना गाणं ऐकवून तो आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे त्याचं उत्पन्नही वाढतं. आकाश आपल्या या अनोख्या पद्धतीसाठी इतका प्रसिद्ध झाला आहे की प्रशिक्षण घेण्यासाठी देशभरातील लोकही त्याच्याकडे येतात.

Published by: sachin Salve
First published: December 15, 2020, 6:27 PM IST
Tags:

ताज्या बातम्या