• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : कडक सॅल्युट! पुरात अडकलेल्यांसाठी देवदूत ठरलेल्या वर्दीतल्या 'बाप' माणसांचा VIDEO पाहून ऊर येईल भरून
  • Special Report : कडक सॅल्युट! पुरात अडकलेल्यांसाठी देवदूत ठरलेल्या वर्दीतल्या 'बाप' माणसांचा VIDEO पाहून ऊर येईल भरून

    News18 Lokmat | Published On: Aug 11, 2019 10:31 PM IST | Updated On: Aug 11, 2019 10:32 PM IST

    मुंबई, 11 ऑगस्ट : पूरग्रस्तांच्या मदतीला लष्कराचे, NDRF, कोस्ट गार्ड, नेव्ही आणि पोलीस दलातले जवान देवदूताप्रमाणे धावून आले. त्यांनी आपला जीव धोक्यात घालून अनेकांना वाचवलं. या जवानांबाबत इथला प्रत्येक नागरिक कृतज्ञता व्यक्त करतोय. असाच एक सांगलीतील गावबाग मधला व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये एक चिमुरडी मेजर शर्माना सॅल्युट करत तुम्ही जबरदस्त काम करताय अशी थेट पोचपावतीच देतेय. माणसाचाच नाही तर मुक्या जनावरांचा जीव वाचवण्यासाठी त्यांची अखंड धडपड सांगली आणि कोल्हापूरच्या पूरपरिस्थितीच्या वेळी दिसली. पुरात अडकलेल्यांसाठी देवदूत ठरणाऱ्या वर्दीतल्या 'बाप'माणसांचे हे व्हिडिओ पाहून तुमचाही ऊर अभिमानाने आणि कौतुकाने भरून येईल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading