• होम
  • व्हिडिओ
  • विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक? तरुणाचा व्हिडिओ व्हायरल
  • विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक? तरुणाचा व्हिडिओ व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jan 18, 2019 06:35 PM IST | Updated On: Jan 18, 2019 07:03 PM IST

    मुंबई, 18 जानेवारी : गेल्या तीन दिवसांपासून सोशल मीडियावर एका नामांकित विमा कंपनीचा माजी कर्मचारी योगेश शेळके या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नाडल्या गेलेल्या शेतकऱ्यांना लुटणाऱ्या व्हाईट कॉलर दरोड्याची पोलखोल या तरुणांने या व्हिडिओतून केली आहे. कर्ज मागण्यासाठी बँकेच्या दारात आलेल्या शेतकऱ्यांच्या माथी पॉलिसी मारली जाते. त्याचे पैसे कर्जातून कपात केले जातात. जो त्याला विरोध करेल त्याला कर्ज नाकारलं जातं, असा गंभीर आरोप त्याने केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडिओनंतर लातूरमध्ये शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या कार्यालयात ठाण मांडून ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. या व्हिडिओचा खुलासा करण्याची मागणी शेतकरी संघटनेनं केली आहे. दरम्यान, बजाज अलाईन्सने एक पत्रक प्रसिद्ध करून चौकशीचे आदेश दिले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading