देवा, बच्चू कडू भाऊले निगेटिव्ह आणू दे... ढसाढसा रडत चिमुरड्यानं देवाला घातलं साकडं

देवा, बच्चू कडू भाऊले निगेटिव्ह आणू दे... ढसाढसा रडत चिमुरड्यानं देवाला घातलं साकडं

सध्या या चिमुरड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  • Share this:

अमरावती, 20 सप्टेंबर: राज्यमंत्री आणि अचलपूरचे (जि.अमरावती) आमदार बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. एवढंच नाही तर बच्चू कडू यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं त्यांनी स्वत: जाहीर केलं आहे. आपल्या लाडक्या नेत्याला कोरोनाची लागण झाल्याचं समजताच समर्थकांना काळजी वाटणं स्वाभाविक आहे. मात्र, बच्चू कडू यांचा सच्चा बाल समर्थक समोर आला आहे.

बच्चू कडू यांना बरं वाटावं म्हणून, 'देवा, बच्चू कडू भाऊले निगेटिव्ह आणू दे... असं म्हणतं ढसाढसा रडत या चिमुरड्यानं देवाला साकडं घातलं आहे. सध्या या चिमुरड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा...पुण्यात झालेला असा हल्ला तुम्ही कधी पहिला नसेल! अंधारात 'तो' आला अन् त्यानं....

एक चिमुरडा व्हिडीओत ढसाढसा रडताना दिसत आहे. 'देवा, बच्चू कडू भाऊले निगेटिव्ह आणू दे.. असं देवापुढे साकडं घालताना तो दिसत आहे. बच्चूभाऊ तुम्ही लवकर बरे व्हा. भाऊंचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येऊ दे.. त्यांना काहीच होऊ देऊ नको, अशी प्रार्थना करतान दिसत आहे.

दरम्यान, या चिमुरड्याच व्हिडिओ बच्चू कडू यांनी देखील आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. 'बेटा मला काहीच नाही होणार, औषधी सोबत आपल्या शुभेच्छा व प्रेम आहे. मग मला काही होणार नाही तु रडला तर मला बर वाटणार नाही. लोकांनी हसावे म्हणूनच आम्ही आयुष्य खर्ची घालतो. खुप मोठा हो सेवा कर..', असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

कुटुंबातील एकूण 12 जणांना कोरोनाची लागण

मागील काही दिवसांपासून राज्यमंत्री बच्चू कडू हे सातत्याने लोकांच्या संपर्कात येत आहे. बच्चू कडू यांना मागील दोन दिवसांपासून अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी आपली कोरोना चाचणी केली होती. त्यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला होता. कोरोना काळातही बच्चू कडू हे सातत्याने फिरत आहे. बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या पत्नी नयना कडू यांना देखील कोरोनाची लागण झाली. तसेच त्यांच्या कुटुंबातील एकूण 12 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: September 20, 2020, 7:02 PM IST

ताज्या बातम्या