ब्लॅक पँथरच्या VIRAL फोटोमागची कहाणी, 2 तासाची प्रतीक्षा आणि 20 मिनिटांची भेट

ब्लॅक पँथरच्या VIRAL फोटोमागची कहाणी, 2 तासाची प्रतीक्षा आणि 20 मिनिटांची भेट

पहिल्याच वाईल्डलाइफ फोटोग्राफिचा अनुभव खूप खास होता. फोटोग्राफर अभिषेक पगनिस शेअर केला अनुभव

  • Share this:

पुणे, 30 जुलै: बिबट्या दिसणं आणि त्यातूनही ब्लॅक पँथर म्हणजे भाग्यचं असं अनेक फोटोग्राफर समजतात. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमागची कहाणीही या फोटोइतकीच रंजक आहे. हा फोटो अभिषेक पगनिस नावाच्या तरुणानं काढलेला आहे. चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र अभयारण्यातला हा फोटो काढतानाचा अनुभव त्यानं सांगितला.

अभिषेक पुण्यात फोटोग्राफर आहे. महाराष्ट्रातील ताडोबा राखीव क्षेत्रात हा फोटो क्लिक केला आहे. अभिषेनं काढलेल्या या फोटोचं सोशलल मीडियावर तुफान कौतुक देखील होत आहे. हा फोटो काढण्यासाठी तब्बल दोन तास प्रतीक्षा करावी लागली आणि त्यानंतर आम्हाला 20 मिनिटं या पँथरचं दर्शन झाल्याचं अभिषेकनं सांगितलं

हे वाचा-अरे देवा! कोरोनापासून वाचण्यासाठी तरुणानं बनवलं फुग्याचं कवच, VIDEO VIRAL

'वाईडलाइफ फोटोग्राफिचा हा माझा पहिलाच अनुभव होता त्यातही ही 20 मिनिटं आमच्यासाठी महत्त्वाची होती. सगळे वाघ पाहून झाल्यावर ताडोबा राखीव वनक्षेत्रात आम्हाला बिबट्या पाहण्याची इच्छा झाली. सफारीच्या शेवटच्या दिवशी बिबट्याच्या शोध घेत संध्याकाळ होत आली तरी पत्ता नव्हता. अखेर दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर संध्याकाळी 5 वाजता आम्हाला बिबट्या दिसला आणि तोही 20 मिनिटं. याला मेलेनिस्टिक बिबट्या म्हणतात.'

पहिल्याच वाईल्डलाइफ फोटोग्राफिचा अनुभव खूप खास होता.कर्नाटकच्या जंगलात याचे फोटो घेतले जातात मात्र चंद्रपुरात आम्ही काढलेल्या बिबट्या हा सेमी मेलेनिस्टिक बिबट्या असल्याचं यावेळी अभिषेकनं सांगितलं.

संपादन - क्रांती कानेटकर

Published by: Kranti Kanetkar
First published: August 1, 2020, 11:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading