पुण्यातील येरवडा जेलमध्ये टोळी युद्ध, कैद्यांची हाणामारीत एक गंभीर जखमी

पुण्यातील येरवडा जेलमध्ये टोळी युद्ध, कैद्यांची हाणामारीत एक गंभीर जखमी

येरवडा कारागृहात पुन्हा तुफान राडा झाला आहे. कारागृहात मंगळवारी कैद्यांच्या झालेल्या हाणामारीत हिंदू राष्ट्र सेनेचा संघटक व सराईत गुन्हेगार तुषार हंबीर गंभीर जखमी झाला आहे.

  • Share this:

वैभव सोनवणे (प्रतिनिधी),

पुणे, 3 जुलै- येरवडा कारागृहात पुन्हा तुफान राडा झाला आहे. कारागृहात मंगळवारी कैद्यांच्या झालेल्या हाणामारीत हिंदू राष्ट्र सेनेचा संघटक व सराईत गुन्हेगार तुषार हंबीर गंभीर जखमी झाला आहे. हंबीर हा मोहसीन शेख खूनातला आरोपी आहे. हिंदु-मुस्लिम वादातून हा हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. तीन मुस्लिम कैद्यांनी हंबीरवर प्राणघातक हल्ला केला. पोलिसांनी शाहरुख उर्फ राशिद शेख, अमान रियाज अंसारी आणि सलीम शेख या तिघांना हंबीरवर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी अटक केली आहे. तिघांनी दगड आणि खिळ्यांनी हंबीरवर वार केले होते. हंबीरवर ससूनमध्ये उपचार सुरू

आहे.

दुसरीकडे, हंबीर याच्या 14 समर्थक कैद्यांनी तुरुंगाधिकारी संदीप रतन एकशिंगे यांच्यावर हल्ला केला आहे. बराकीची पाहणी करीत असताना त्यांच्यावर कैद्यांनी हल्ला केला. यामध्ये झालेल्या बेदम मारहाणीमुळे त्यांनाही रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या दोन्ही प्रकरणी येरवडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कुख्यात गुन्हेगार श्वेतांग निकाळजे आणि हिंन्दुराष्ट संघटनेच्या कार्यकर्त्तानी घातला एका आरोपीच्या डोक्यात दगड घातला. मोहम्मद नदाफ असे जखमी कैद्याचे नाव आहे. कालपासून पेटलेल्या या टोळीयुध्दात तीन जण आतापर्यंत गंभीर जखमी झाले आहेत. येरवडा कारागृहातील टोळी युद्धामुळे एसआरपीएफला कारागृहात पाचारण करण्यात आले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कारागृह प्रशासनाने 23 कैद्यांची कोल्हापूर कारागृहात स्थलांतरित करण्यात आले आहे.

VIDEO: एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं...लोकांनी हंबरडा फोडला

First published: July 3, 2019, 11:04 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading